रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986
ब्रम्हपूरी:-ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंग मध्ये जगातील नंबर एकचे नेते, विश्वगुरू, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय समाजातील मुलां मुलींमध्ये भेदभाव आणि लैंगिक असमानतेकडे लक्ष वेधण्यासाठी “बेटी पढाओ, बेटी बचाओ”ही सरकारी सामाजिक योजना बुधवार, दिनांक 22 जानेवारी 2015 रोजी पानिपत, हरियाणा येथे उद्घाटन करून सुरू करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही महत्त्वाकांक्षा योजना असून या योजनेचा प्रसार सर्वसामान्य महिलांपर्यंत व्हावा या उद्देशाने भारतीय जनता महिला मोर्चाच्या वतीने “बेटी पढाओ,बेटी बचाओ” या अभियानाची जागृती युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. या अभियानाच्या जिल्हा संयोजिका तथा भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री सौ. वंदनाताई आगरकाटे, तसेच भाजपा महिला मोर्चाच्या पूर्व विदर्भ सोशल मीडिया संयोजिका सौ.लक्ष्मीबाई सागर यांनी महिला मोर्चाच्या संघटनेबाबत,रांगोळी स्पर्धा उपक्रम, बेटी पढाओ,बेटी बचाओ या अभियानाची विस्तृत माहिती यावेळी दिली.
तत्पूर्वी गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष खासदार मा.अशोकजी नेते यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन बेटी पढाओ,बेटी बचाओ” या अभियानाची जागृती युद्ध पातळीवर करण्यात यावे.यासाठी योजनांचा लाभ घेण्याकरता सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. तसेच खासदार अशोक नेते यांनी भाजपा महिला मोर्चा ब्रह्मपुरीची कार्यकारणी तसेच “बेटी पढाओ बेटी बचाओ “या अभियानाची देखील कार्यकारणी घोषित केली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलतांना ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय प्रा.अतुलभाऊ देशकर म्हणाले की, “बेटी पढाओ,बेटी बचाओ” म्हणजे मुलींची सुरक्षा करणे आणि त्यांना संपूर्ण शिक्षण देणे. ही योजना नरेंद्र मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेचा महत्त्वपूर्ण उद्देश भारतातील मुली आणि महिलांसाठी कल्याणकारी उपक्रमांची कार्यक्षमता वाढवणे. तसेच लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा आहे.
या बैठकीला महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.वंदनाताई शेंडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्षा एड. सौ. दिपालीताई मेश्राम, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ. शीलाताई गोंधोळे, भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री सौ.उर्मिलाताई धोटे, भाजपा जिल्हा मोर्चाच्या उपाध्यक्षा सौ. मंजिरीताई राजनकर, माजी उपसभापती सौ. सुनीताताई ठवकर, माजी पंचायत समिती सदस्या सौ.कल्पनाताई शंभरकर, सौ. शितलताई राखडे, सौ.वैशालीताई राऊत, कोमल मनोहर ढोंगे, संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती ब्रम्हपूरीच्या सदस्या सौ.कविताताई राहाटे, सौ.बेदरेताई इत्यादी महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. तर या कार्यक्रमाला भाजपा शहराध्यक्ष इंजिनियर अरविंद नंदुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा. रामलाल महादेव दोनाडकर,भाजपा ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा. डॉ. अशोक सालोटकर, नगरसेवक मनोज वठे, भाजपा सोशल मीडिया महामंत्री प्रशांत वसाके , शहर महामंत्री भाजयुमो पंकज माकोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन सौ.वंदनाताई शेंडे यांनी केले तर आभार सौ. उर्मिलाताई धोटे यांनी मानले.