🔸भिसी येथे संताजी महाराज जयंती उत्सव साजरा-संताजी महाराजांच्या जयघोषाने भिसी नगरी दुमदुमली
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8208946716
भिसी(दि.9डिसेंबर):- तेली समाज पंचकमेटी, संताजी महाराज उत्सव समिती, संताजी महाराज महीला व युवक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 400 व्या जयंती उत्सवाचे आयोजन भिसी येथे करण्यात आले.जयंती निमित्त हजारोंच्या संख्येने तेली बांधव शोभायात्रेत सहभागी झाले होते.शोभायात्रेत लेझीम पथक,अश्व, संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरील विविध देखावे, भगवे झेंडे,पताका,भगवी टोपी,50 वारकरी भक्तांचे भजन मंडळ आणि संताजी महाराजांच्या जयघोषाने भिसी नगरीत जणू काही पंढरीच अवतरली होती.
शोभायात्रेदरम्यान तेली समाजातील सेवाभावी व्यक्तींनी चौका-चौकात चहा -पाण्याची, नास्त्याची व्यवस्था केली होती.हि शोभायात्रा संपूर्ण भिसी शहरातुन मार्गक्रमण करून तेली समाज भवनापर्यंत पोहचली.आकर्षणाचे केंद्र शोभायात्रेत वारकरी संप्रदाय मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले. वारकय्रांनी टाळ मुदृगाच्या गजरात पालखीला सुरुवात केली होती.
मुलीच लेझीम पॅथक एका रांगेत मोठया उत्साहात पाहावयास मिळाले, तसेच महिला मंडळानी सांस्कृतिक पध्दतीने वस्त्र परिधान करून शोभायात्रेत शोभा वाढवलेली होती.पुरुष मंडळानी सुध्दा संत जगनाडे महाराजाची प्रतिकृती असलेली कुर्ता पायजमा घालून शोभायात्रेत सहभाग घेतला होता.भिसी नगरीतील सर्व भजन मंडळांनी शोभायात्रेत सहभाग घेतला होता.
संत जगनाडे महाराज यांच्या झांकीत संत जगनाडे महाराज याच्यावर विविध प्रकारच्या झाॅक्या काढण्यात आल्या होत्या, संत जगनाडे महाराज यांच्या जन्माची प्रमुख झांकी काढण्यात आलेली होती, विठ्ठल माझा, तुकाराम महाराजाचे अंभग, घाण्यातून तेल काढतांना ची झाॅकी अशा अनेक प्रकार सुशोभीत करण्यात आल्या होत्या.स्वागत गेट भिसीच्या मुख्य मार्गानी संत जगनाडे महाराजाचे स्वागत गेट उभारण्यात आले होते,
शोभायात्रेदरम्यान समाजभवन येथून निघालेल्या प्रमुख स्वागत गेटजवळ स्वप्नील मुंगले धनराज मुंगले, यांच्याकडून फुलांचा वर्षाव करण्यात आलेला होता. तसेच जुनी ग्रामपंचायत येथे त्यांनी शोभायात्रेत आलेल्या असंख्य भाविक भक्तांवर सर्व प्रकारच्या फुलांचा वर्षाव करण्यात आलेला होता,अरविंद रेवतकर मित्र परिवार यांच्याकडून पोलीस स्टेशन परिसरात मुख्य रस्त्यावर संत जगनाडे महाराज जंयती निर्मित स्वागत गेट तयार करण्यात आले होते. आणि शोभायात्रे आलेल्या सर्व मंडळीना बुंदा आणि गुलाबजामुन ( स्विट) देण्यात आले.शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करण्यात आलेल होते.
किशोर मुंगले मित्र परिवार यांच्याकडून समता चौक ( परमात्मा हॉल जवळ) संत जगनाडे महाराजाची प्रतिकृती ठेवून रांगोळी काढून सर्व भाविक- भक्ताना चहा देऱ्यात आले होते.घनश्याम डुकरे मित्र परिवार यांच्याकडून जुनी बॅक ऑफ महाराष्ट्र याच्यासमोर श्री संत जगनाडे महाराज यांची प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती, तसेच त्यांनी थंड पाण्याची व्यवस्था केलेली होती.संजय गिरडे मित्र परिवारकडून थंड पिण्याची सोय करण्यात आली होती.अल्पोहाराने संताजी जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला.