संजय बागडे नागभीड प्रतिनिधी 9689865954
नागभीड:- नागभीड तालुक्यात मागील सप्ताहातील 28 नोव्हेंबर ला झालेल्या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे उभे व कापलेले धानपिक पावसाने भिजले. ते कापलेले धानपिकाच्याया कडपा पलटवू पलटवू वाळत असतांनाच काल पासुन पुन्हा पाऊसाची रिमझिम सुरू झाल्याने वाळलेल्या धानाचे कडपा पुन्हा भिजल्या त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याने कमालीचा चिंताग्रस्त असल्याचे चित्रं पाहायला मिळतं आहे.
सर्वत्रच पडतं असलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला असल्याचे चित्रं दिसत आहे. नागभिड तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांकडे भारी धानपिकाचे जातीची धानपिक अता नुकतीच कापनीला आली होती. तर अनेकांचे धानपिक कापुन शेतातच आहेत. मागील आठवड्यात झालेल्या धानपिकाने मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. पुन्हा कसेबसे धान पिक वाढवली मात्र पुन्हा कालपासुन पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असुन पुरता हतबल झाला आहे. या अवकाळी पाऊसाने झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविमा व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या झालेली नुकसान भरपाई मिळावी असी मागणी शेतकरी करीत आहे.