Home यवतमाळ S- Zone मधील विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनी केले महामानवास अभिवादन

S- Zone मधील विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनी केले महामानवास अभिवादन

289

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.6 डिसेंबर) मागील काही वर्षामध्ये आपण पाहत आहोत की या देशातील प्रत्येक विद्यार्थी, युवक, कर्मचारी, शेतकरी, महिला हे सर्वजन आपल्या हक्क अधिकारासाठी लढत आहेत.
आजचा युवक हा उद्याच्या भारताचे भविष्य आहे.
आणि हे भविष्य टिकवायचे असेल तर त त्यांच्या हाताला काम द्यावं लागेल त्यांना रोजगार द्यावा लागेल. परंतु आजची परिस्थिती पाहता लोकशाही भारतामध्ये सुद्धा आम्हाला प्रत्येक हक्क अधिकार प्राप्त करण्यासाठी आरक्षणासाठी, रोजगारासाठी, रस्त्यावरची लढाई लढावी लागत आहे.

विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांचे हक्क अधिकार जर हिरावून घेतले जात असतील तर यांच्या भविष्याची वाटचाल चुकीची होत आहे असे दिसून येते.

असे विचार व्यक्ती करीत, लोकशाही भारताची निर्मिती, शिक्षणाची संधी, रोजगाराची संधी,अशा अनेक कार्याची जाणीव करत, यावेळी उपस्थित मा. शरद वारकड सर , भारतीय विद्यार्थी मोर्चा चे पदाधिकारी अत्तदीप धुळे तसेच अभ्यासीकेतील प्रत्येक जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाण दिनानिम्मित लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न शिल राहून एक सुज्ञ नागरिक होण्याचा संकल्प करत उमरखेड येथील S-Zone मधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्ञानाचा अथांग महासागर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here