Home महाराष्ट्र वैभव पोरे यांचेकडून दिव्यांगाना व्हील चेअरचे वाटप

वैभव पोरे यांचेकडून दिव्यांगाना व्हील चेअरचे वाटप

90

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड)

म्हसवड : म्हसवड व परिसरातील शाळांमध्ये शिक्षण घेत असणाऱ्या व शिक्षणासाठी शाळेत ३ते ५ किमी पायी चालत जावून ज्ञान मिळवणाऱ्या गरजू विद्यार्थीनींसाठी श्री वैभव पोरे यांच्या Wheeling for Education उपक्रमांतर्गत पुणे येथील भूमी संस्था व श्री वैभव पोरे यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय काळचौंडी ता माण , जि सातारा येथील ५ गरजू विद्यार्थीनींना सायकल व स्कूल बॅग तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य व स्टेशनरी कीट चे सन्मानपूर्वक वाटप करण्यात आले .
तसेच ४ गरजू दिव्यiग विद्यार्थ्यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.
म्हसवड येथील वैभव गणेश मंडळ यांचे श्री पावन गणेश मंदीर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला .
या प्रसंगी डॉ श्री मोहन झगडे , श्री रणजित येवगे , श्री कैलास भोरे , श्री आनंद माने , श्री उद्धव बाबर सर , काळचौंडी विद्यालयाचे प्राचार्य श्री माने सर ,श्री मासाळ सर , श्री सुभाष गोंजारी सर , श्री प्रशांत कारंडे सर ,श्री विजय बनसोडे सर , श्री सुशील त्रिगुणे सर , पत्रकार श्री एल के सरतापे , श्री धनंजय पानसांडे , वैभव गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे औचित्य साधून वैभव गणेश मंडळ यांचे वतीने श्री वैभव पोरे यांचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाले बद्दल सत्कार करण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here