Home महाराष्ट्र सेवेकरी माऊंल्या सोबत ‘आनंदाची दिवाळी’ साजरी महिलांना आ.डॉ.गुट्टेंकडून मिळाली भाऊबीज...

सेवेकरी माऊंल्या सोबत ‘आनंदाची दिवाळी’ साजरी महिलांना आ.डॉ.गुट्टेंकडून मिळाली भाऊबीज : साडी व साखर देऊन आनंदोत्सव

127

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी

गंगाखेड (प्रतिनिधी)
ग्रामीण व शहरी भागातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा प्रामाणिकपणे देणाऱ्या माय-माऊंल्याशी कृतज्ञता व्यक्त करून ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी करण्यासाठी गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी पुढाकार घेत भाऊबीज म्हणून तब्बल दोन हजार माता भगिनींना नवकोरी साडी व साखर वाटप केली. त्यांच्या या आपुलकीपूर्ण भेटीने माय-माऊंल्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यामुळे ‘आनंदाची दिवाळी’ साजरी झाली.

दिपावली सणाचे औचित्य साधून गंगाखेड, पालम आणि पूर्णा येथे आयोजित या अनोख्या कार्यक्रमात तिन्ही तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका, सेविका, मदतनीस, महिला सफाई कामगार, पंचायत समिती बचत गट, सीआरपी महिलांना साडी व साखर भेट देण्यात आली.

अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा देणारा उत्सव म्हणजे दीपावली. त्या निमित्त ऊर्जा, मांगल्य आणि तेज द्विगुणित करण्यासाठी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. विविध समाज घटकांसाठी या महिला सामाजिक बांधिलकी जोपासून कार्यरत आहेत.‌ म्हणून त्यांच्याही आयुष्यात आनंदाचे कवडसे निर्माण व्हावेत आणि भाऊबीज भेट द्यावी, यासाठी हा सोहळा महत्त्वाचा आहे, असे भावनिक प्रतिपादन आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी बोलताना युवा उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे म्हणाले की, साड्या वाटप करताना महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांचे मिळणारे आशीर्वाद मला शब्दात सांगता येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला जेवढं जमते तेवढे मनापासून करणे गरजेचे असते. साखरेच्या गोडव्या सारखा गोडवा माय-भगिनींच्या आयुष्यात फुलवा म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे.

स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड, पालम व पूर्णा येथील जनसंपर्क कार्यालयात अतिशय आपुलकीने आयोजित या उत्साही कार्यक्रमास युवा उद्योजक सुनील रत्नाकर गुट्टे, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दादा रोकडे,

उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, गटविकास अधिकारी जयराम मोडके, उदयसिंग शिसोदे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, रासपा जिल्हाध्यक्ष ॲड.संदीप आळनुरे, पालम तालुका प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेड प्रभारी हनुमंत मुंडे, जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर, सुभाष देसाई, गंगाखेड तालुका अध्यक्ष रामप्रसाद सातपुते, पालम तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, पूर्णा तालुका अध्यक्ष गणेश कदम, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, नगरसेवक उबेदखान पठाण,असदुल्ला पठाण, मोबिन कुरेशी, नागनाथ कासले, वैजनाथ टोले, उद्धव शिंदे, सतिश घोबाळे, संजय पारवे, प्रताप मुंडे, दिपक तापडीया, रत्नाकर सूर्यवंशी, मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचे सचिव ॲड.मिलिंद क्षिरसागर, संतोष पेकम यांच्यासह तालुक्यातील सर्व आशा वर्कर, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस, महिला सफाई कामगार, सि.आर.पी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here