धरणगांव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर
धरणगाव : बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रचंड प्रतिसाद नोंदवला. एकूण 90.04 टक्के मतदान झाले होते.
बाभुळगाव येथे शासनाच्या तंतोतंत नियमांचे पालन करून शांततेत निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. बाभुळगाव लोकनियुक्त सरपंच पदी पवन गजानन पाटील हे विजयी झाले. तर सदस्य साठी , सौ. मंगला अरुण अहिरे, सौ. रेखा रवींद्र मोरे, सौ. अनिता सुरेश भालेराव, सुनंदा रवींद्र काळे, विकास राजेंद्र कोळी, प्रशांत कोळी ( बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले. निवडणुकीत एकूण 16 सदस्य रिंगणात होते. यात काही तांत्रिक अडचणी मुळे फॉर्म मागे न झालेल्या उमेदवारांचां देखील समावेश आहे.