Home चंद्रपूर ढोरपा ग्रामपंचायत सचिवाचा मनमानी कारभार चौकशी करून कारवाई...

ढोरपा ग्रामपंचायत सचिवाचा मनमानी कारभार चौकशी करून कारवाई कडक कारवाई करा-सदस्य सुधाकर मेश्राम

61

 

 

 

संजय बागडे ९६८९८६५९५४

नागभीड:-तालुक्यातील ढोरपा गट ग्रामपंचायत चे सचिव एस. राठोड हे ग्रामपंचायत सदस्यांना व नागरिकांना न जुमानता स्वमजि्नेच वागून काम करतात. सचिव कोणत्याही सभेची कार्य वाही साध्या कागदावरुन वाचून सांगत असल्याचे सदस्य मेश्राम यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रार मध्ये दिले आहे. ठराव संबंधित प्रश्न विचारले असता सदस्यांना सभेतुन बाहेर काढले जाते, मात्र ठराव रजिस्टर मध्ये नोंद घेतली जात नसल्याचे स्पष्ट केले आहे. दि. २३आगस्ट२०२३च्या ग्रामसभेत कोरम पुर्ण झाला, सभा सुरू होताच सभासदांनी प्रश्न विचारताच उत्तरे न देताच सभा संपली असे सांगून सरपंच व सचिव दोन्ही सभेतुन निघून गेले. त्यामुळे एकंदरीत ग्रामपंचायत मध्ये खुप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असावा असे जनतेमध्ये बोलल्या जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य सुधाकर मेश्राम यांनी २६आक्टोबर च्या मासिक सभेनंतर गटविकास अधिकारी यांना मोबाईल वरुन सुचना देण्यात आली आहे. तसेच ३० आक्टोबर ला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे काय कारवाई होणार याकडे गावकर्यांच्या नजरा भिडल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here