सातारा प्रतिनिधी- आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आदर्श राज्यस्तरीय समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून त्यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय योगदान असणाऱ्या व्यक्तींनी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातील माहिती अशी, पाडळी केसे तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. दलित पददलीत वंचित, विधवा, परितक्त्या आणि निराधार घटकांना आतापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे. चालू शिक्षण,आरोग्य, क्रीडा,सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर्श माता राज्य स्तरीय समाजसेवा पुरस्काराने गौरव करण्यात येणार असून सामाजिक आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम असणारे व्यक्तींनी आपल्या आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याच्या फोटोसह प्रस्ताव पाठवावेत. शाल, श्रीफळ, बुके सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे तरी आपले प्रस्ताव संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान पाडळी केसे तालुका कराड जिल्हा सातारा या पत्त्यावर पाठवावेत असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे