बळवंत मनवर/पुसद
पुसद येथील एका व्यापाऱ्याने व्यापाऱ्यास दिलेले उसणवारीचे पैसे परत देण्यासाठी दिलेला धनादेश अनादर झाल्याने सदर प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि साक्षपुराव्या अंतिम आरोपी अनिल उत्तरवार या व्यापाऱ्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने त्यास दंडासह शिक्षाही ठोठावण्याचा निर्णय देण्यात आला. पुसद येथील कपडा व्यापारी रवि निर्मल ग्यानचंदानी हयांनी श्रीरामपुर रहिवासी आरोपी व्यापारी नितीन भाउराव उत्तरवार हयांस व्यापारा करीता ३ लाख २० हजार रूपये उसनवार दिले होते. त्या रकमेच्या परतफेडी करीता नितीन उत्तरवार हयांनी पुसद अर्बन- को. ऑप. बॅन्क.शाखा.पुसद चा चेक दिला होता. तो फिर्यादीने बँकमध्ये वटविण्याकरीता टाकला असता फिर्यादी हयास रक्कम न मिळाल्यामुळे फिर्यादी हयांनी वि.न्याय दंडाधिकारी प्र. श्रे. पुसद यांचे न्यायालयात निगोसिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. चे कलम. १३८, अनुसार प्रकरण दाखल केले. हया प्रकरणामध्ये न्यायालयाने फिर्यादीचे वकील ॲड. यासीर अहेमद खॉन यांनी सादर केलेले साक्ष पुरावे ग्राह्य मानून आरोपी उत्तरवार याचे विरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याने दिनांक ३०.१०.२०२३ रोजी आरोपीस रु ६ लाख रुपये दंड ठोठावला व सहा महिन्याची शिक्षा दिल्याचा निकाल घोषित केला.