Home महाराष्ट्र शिका.!संघटित व्हा.!!आणि संघर्ष करा..!या बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्री आत्मसात केल्याशिवाय समाजाचा विकास शक्य...

शिका.!संघटित व्हा.!!आणि संघर्ष करा..!या बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्री आत्मसात केल्याशिवाय समाजाचा विकास शक्य नाही – साहेबराव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते)

146

 

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड :- (दि. 26 ऑक्टोंबर) शिका..! संघटित व्हा..!! आणि संघर्ष करा..!!! या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिसूत्रीला आत्मसात केल्याशिवाय समाजाचा विकास शक्य नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी व्यक्त केले.
ते स्थानिक जय भीम नगर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपालभाऊ अग्रवाल उपा. वंदनाताई कांबळे मॅडम,अर्जुन बर्डे ऍड भैय्या पवार, ऍड संजय जाधव, यशवंत काळबांडे,पत्रकार सतीश कोल्हे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेणबत्ती प्रजल्वित करून तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अर्जुन बर्डे यांनी सांची स्तूप बौद्ध विहार या ठिकाणच्या आवश्यक असलेल्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

यानंतर सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे यांनी अर्जुन बर्डे यांनी प्रस्ताविकातून मांडलेल्या गरजांना प्राधान्य देत सांची स्तूप बौद्धविहारसमोर तात्काळ वृक्षारोपण करून देण्याचे यावेळी आश्वासन देऊन धम्मवंदनेसाठी प्रशस्त अशा हालचे बांधकाम देखील आगामी काळात करून देण्याचे आश्वासन दिले.

सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बुद्धघोष ढोले यांनी केले या कार्यक्रम प्रसंगी सांची स्तूप बौद्ध विहार महिला मंडळाच्या अध्यक्षा निर्मलाताई बर्डे उपाध्यक्ष अंबिका ढगे सचिव सुमन शिंगणकर सदस्य रत्नमाला नरवाडे अनुसया खंदारे मंगला हनवते माधुरी गायकवाड यांच्यासह महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दत्ता शिनगारे नरवाडे खंदारे गायकवाड कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांची स्तूप महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here