Home महाराष्ट्र समायोजन झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही-कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा निर्धार

समायोजन झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही-कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा निर्धार

128

 

 

गडचिरोली / चक्रधर मेश्राम

मुंबई- येथे आरोग्य भवनात MD धीरज कुमार व बोरकर सर यांच्या उपस्थितीत, राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कंत्राटी समायोजन कृती समितीचे सर्व पदाधिकारी समवेत दिनांक 25 आक्टोबर रोजी बैठक पार पडली. हि बैठक सतत 2 तास चालली . बैठकीत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे केले जाईल, यासाठी अनेक पैलूवर सविस्तर चर्चा करून अनेक विषयांची मांडणी करण्यात आली. ओडिसा, माणिपूर, राजस्थान, मध्यप्रदेस, आंध्रप्रदेश व हल्ली महाराष्ट्राचे शासन सेवेत समायोजनाचे आदेश याची सविस्तर मांडणी करण्यात आली. महाराष्ट्रात ते कसे शक्य करता येईल याची पूर्ण आराखडा संघटनेने सादर केला.. सर्व मते मतांतरे झाल्यानंतर MD सरांनी संप मागे घेण्यासाठी विनंती केली. परंतु समायोजन झाल्याशिवाय संप माघार घेणार नाही असे स्पष्ट केले. आता समायोजन झाल्याशिवाय माघार नाही, दिनांक 30 आणि 31 आक्टोबरला सर्वांना मोठया संख्येने आझाद मैदानात उतरायचे आहे, शासनाला वेठीस धरल्याशिवाय न्याय मिळणार नाही. त्यासाठी सर्वांनी शिवाजी महाराज, झाशी ची राणी बनून आपल्या समायोजनासाठी लढण्यास मैदानात उतरले पाहिजे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here