बीड जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ आडे,9075913114
एखाद्या व्यक्ती आजारी असल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं, पर्यायाने आय सी यु मध्ये ठेवलं जातं, व सर्वच देवाचा धावा करीत प्रार्थना करत असतात की, आपला रुग्ण बरा झाला पाहिजे पण ज्यावेळेस देवही काही करू शकत नाही. अशा वेळेस धरतीवर देवाच्या रूपामध्ये साक्षात डॉक्टर त्या ठिकाणी साक्षात्कार घडवून आणतात आणि त्या रुग्णाचे प्राण वाचून त्याला एक नवीन जीवन देतात. देव आहे की नाही हे माहित नाही. परंतु डॉक्टरांच्या रूपामध्ये जेव्हा जेव्हा डॉक्टरांकडे पाहतात तेव्हा तेव्हा ते देवच भासतात याप्रमाणेच रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी बीड जिल्ह्यातील गेवराई शहरांमध्ये रुग्ण सेवा करण्यासाठी डॉक्टर प्रदीप राठोड यांनी आज (दि. २४ अक्टोंबर) रोजी विजयादशमीचे औचित्य साधून रुग्णांच्या दृष्टीने अतिशय चांगले एक पाऊल उचलले आहे. त्यांनी गेवराई मध्ये आज दसऱ्यानिमित्त एका शारदा ॲम्बुलन्स नावाने एका रुग्णवाहिकेची सोय केली आहे. जेणेकरून आपल्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण हा व्यवस्थितरित्या आपल्याकडे येईल आणि व्यवस्थित रित्या त्याच्या निश्चित स्थान पर्यंत म्हणजेच त्यांच्या निवासस्थानी पोहोचेल, आणि त्यांचा प्रवास सुखकर होईल, डॉक्टर प्रदीप राठोड हे अहोरात्र गेवराई मध्ये रुग्णांची सेवा करीत असतात. आणि रुग्णांच्या हेतूने त्यांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करीतच असतात. त्यामुळे गेवराई तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थांच्या मनामध्ये ते घर करून बसले आहेत. आणि रुग्णांच्या मनात घर करणारे ते गेवराई शहरातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत. काही ठिकाणी असं बघायला मिळतं की तिचा पिझ्झा मिनिटांमध्ये डिलिव्हर करता येतो. परंतु ॲम्बुलन्स वीस मिनिटांमध्ये येण्याची गॅरंटी दिली जात नाही. ही एक खेदाची बाब आहे. रुग्णवाहिका म्हणजेच काय तर दुसरेरुग्णवाहिका हे वैद्यकीयदृष्ट्या सुसज्ज वाहन असते. ज्यात रूग्णालयांसारख्या उपचाराच्या ठीकाणी रूग्णांची ने-आण करण्यासाठी वापरतात. काही वेळेस रुग्णालयाबाहेरची वैद्यकीय सेवा देखील रुग्णवाहिकेत रुग्णाला पुरवली जाते. आपत्कालीन वैद्यकीय सेवांद्वारे रूग्णाला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. डॉक्टर प्रदीप राठोड सर यांच्या प्रयत्नातून बीड संभाजीनगर येथील रुग्णाची दगदग थांबली असून डॉ प्रदीप राठोड सर यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले यावेळी
शारदा हॉस्पिटल चे सुप्रसिद्ध डॉ. प्रदिप राठोड सर, डॉ. जगदिश पोतदार सर (IMA PRECIDENT) माने काका, अनिल राठोड, राहुल मोटे, दिलीप लाड, दत्ता फलके, माऊली माने, पवन जाधव, राधेश्याम जाधव, धिरज कांबळे सह उपस्थित होते