सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड (दि. 25 ऑक्टोंबर) शहरातील मुख्य मिरवणूक म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मधून अनेक वर्षांपासून धम्मचक्र परिवर्तन दिन व प्रियदर्शनी सम्राट अशोक विजयादशमी उत्सव सोहळा निमित्त भव्य मिरवणूक रॅली चे आयोजन 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे सकाळी 10 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळभाऊ अग्रवाल (सामाजिक कार्यकर्ते उमरखेड) सुभाषराव दिवेकर (माजी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुंबई), तर प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव कांबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यानंतर उपस्थित मा.गोपळभाऊ अग्रवाल, मा.सुभाषराव दिवेकर, मा.साहेबराव कांबळे,मा.वंदनाताई कांबळे, मा.हिराबाई दिवेकर, मा.कुमार केंद्रेकर, मा.राहुल काळबांडे, मा.उत्तम शिंगणकर इत्यादी पाहुणे मंडळीयांचे उत्सव समितीच्या पदाधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ व पंचशील शाल देऊन स्वागत करण्यात आले.
तर सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणुक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. रॅली मध्ये युवतींच्या नृत्य प्रदर्शन केले. आणि झाकी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या भूमिके च्या सादरीकरणामुळे वेगळे आकर्षण निर्माण झाले होते.
सदर मिरवणूक आंबेडकर वार्ड मधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर जाऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्रिशरन पंचशील ग्रहण करून पुतळ्या पासून खडक पुरा, सोनार लाईन मधून डॉ. आंबेडकर वार्ड येथे शांततेत पार पडली.
या मिरवणुकीचे आयोजन 67 वा धम्मचक्र परिवर्तन दिन उत्सव समितीचे अंकुश दिवेकर (अध्यक्ष), आकाश श्रवले (कोषाध्यक्ष), अजय दिवेकर, विकास धुळे (उपाध्यक्ष), योगेश दिवेकर (सचिव) मुख्य सल्लागार प्रफुल दिवेकर, सिद्धार्थ दिवेकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.
यावेळी उमरखेड तालुक्यातील हजारो जन समुदाय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उमरखेड येथे दाखल झाला होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सिध्दार्थ दिवेकर (पत्रकार) यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल दिवेकर (सामाजिक कार्यकर्ते) यांनी मानले.