आई देवीला जन्म देणाऱ्या आईवडीलांचे नांव गांव तालुका,जिल्हा राज्य देश कोणता होता गं?.आई तिचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण कुठे व किती झाले होते गं?.आई ती वाघावर स्वर होऊन फिरते तेव्हा वाघ हा पाळीव प्राणी होता का गं?.मग आज वाघ हा हिंस प्राणी का आहे?. अगं आई देवी कुमारी होती की तिचे लग्न झाले होते काय गं?.आई ती सर्व सौभाग्यवतीचे लेणे अलंकार घालून मेकअप करून दाखवली जाते, मग तिच्या नवऱ्याचे नांव गांव काही चं कसे सांगितले जात नाही गं?. आणि आई तिला नऊ दिवस पूजल्या जाते मग तिचे पाण्यात विसर्जन का केल्या जाते गं?.हे प्रश्न आजची उच्चशिक्षित मुलगी आईला का विचारत नाही?.
आज प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल,स्मार्टफोन आहे.गरीब असो की श्रीमंत,असंघटित कामगार,असो की संघटित कामगार,कर्मचारी अधिकारी प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे तो मोबाईल घेऊन वापरतो.घरात कॉम्प्युटर,वायफाय,3 जी,4 जी च्या पुढे दररोज वेगाने जात आहे.तरी स्मार्टफोन व कॉम्प्युटरच्या स्किनवर देवादेवीच्या फोटोची छबी ठेवतोच.नेटवर्क नसेल तर स्मार्टफोनच्या स्किनवरील देव,देवी काहीच करू शकत नाही. नेटवर्क फुल आहे आणि रिचार्ज केला नसेल तर?. देव,देवी काई चमत्कार करून रिचार्ज न करता मोबाईल चालू करू शकतो काय?.तर बिलकुल नाही.कारण नेटवर्क,स्मार्टफोन कॉम्प्युटर,हार्डवेअर, सोफ्टवेअर हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच विज्ञान आहे. माणसांच्या जीवनातील दररोजच्या घडामोडींचा बारकाईने विचार केला तर आज घरत दारात कार्यालयात माणसाने विकासित केलेल्या तंत्रज्ञाना शिवाय कोणाचेच पान हलत नाही. तरी बिगर चपला वाले खूप दिसतात.नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे, साड्या,ड्रेस घालणारे लक्षवेधी दिसतात.का ???. स्री शिक्षणामुळे आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्रिया आहे ते कोणत्या देवीचा जागर केल्यामुळे नाही.देशात स्रियांना सर्वच ठिकाणी देवी अवतार म्हणून गणल्या जात नाही.देशाची राष्ट्रपती एक महिला स्री आहे पण ती विधवा आणि आदिवाशी आहे म्हणून शुभ कार्याची सुरवात करणाऱ्या कार्यक्रमाला बोलाविल्या जात नाही.ती देशाची प्रथम नागरिक व सर्वोच्च पदी असून तिला धर्मानुसार वागणूक दिली जाते.कोणत्याही धर्माचा अवमान करणे,कोणाच्या धार्मिक भावना दुखावने हा लेखाचा उद्धेश नाही.तर तर आधुनिक तंत्रज्ञान विज्ञानाने अनेक शोध लावले आणि त्याचा आपण सर्वच दररोजच्या जगण्यात उपभोग घेतो तरी तेच अज्ञान सर्वश्रेष्ठ मानणार असू तर ते भविष्यात दुखांचे कारण असेल हेच सांगण्याचा मुख्य उद्धेश आहे.
आजच्या उच्चशिक्षित मुलगीला आई शास्त्रीय जागर कशी सांगते ते वाचा.
“काय कटकट आहे!” म्हणत,पाय आपटत श्रुतिका आरतीला आली. तिच्या चेहेऱ्यावरचा त्रासिक भाव आईने टिपला होता. आरती झाल्यावर प्रसादासाठी पुढे आलेल्या हातावर चापट देत आई म्हणाली, “आता कशाला प्रसादाला पहिला नंबर? यायचं नव्हतं ना आरतीला?” अर्धवट कळत्या,१३ वर्षे वयाच्या श्रुतिकाला हे पूजा,आरती,नवरात्र सगळं बोरिंग वाटत होतं. आज आईने तिला समजवायच ठरवलं. “काय गं,तुला माहित आहे का नवरात्र का करतात?” आई ने विचारलं.तशी ती रागाने म्हणाली, “त्यात काय, काहीतरी ऑर्थोडॉक्स रूढी,कुठे देवी पाहिली कोणी? पण म्हणे ९ देवींची पूजा असते.मम्मा,तू काहीही म्हण,मला पटत नाही हे.” “अगं पण तुला कोणी सांगितलं की देवींची पूजा करण्यासाठीच नवरात्र आहे असं. त्याला शास्त्रिय आणि वैचारिक दोन्ही आधार आहेत.ऑर्थोडॉक्स आहे की नाही तूच ठरव” आई म्हणाली. “हँ, त्यात काय शास्त्रीय? ” श्रुतिका
“बाळा, नवरात्र हे बी- बियाणांच testing kit आहे. पूर्वी आतासारखी खूप बियाणं किंवा खतं नव्हती मग सगळ्या प्रकारची धान्य थोडी थोडी टाकून त्याचं एकप्रकारे testing केलं जातं नवरात्रात की ह्यांच्यापासून पीक कसं येईल? ” “हो का? Interesting आहे. पण मग आताच का?” श्रुतिकाला प्रश्न पडला म्हणून आईला बरं वाटलं. “बरोबर विचारलं, अगं या दरम्यान रब्बी पिकांचा हंगाम सुरू होतो, आणि ती पिकं पाण्यावर वाढतात ना मग हा trial pack बरं का!” आईने उत्तर दिलं. (मग नऊ दिवस नऊ रंगाचं साड्या बिगर चपल ने चालणे,रात्री गरबा खेळणे काहीच संदर्भ जुळत नाही.)
” wow,मम्मा,भारीच की,आणि लोकांनी ते मनापासून करावं म्हणून देवाचं नाव, हो ना?” श्रुतिका एकदम excite झाली होती.”पण मग आई ते, तू जोगवा मागायला का पाठवते? मला नाही आवडत. खूप embrassing वाटतं” श्रुतिकाने आईला मनातलं सांगितलं. “हे बघ बाळा, मी म्हंटलं ना, वैचारिक पण पार्श्वभूमी आहे. जोगवा मागणे म्हणजे काय तर आपला वृथा अभिमान बाजूला ठेवून शरण जाणे. पूर्वी लोक ह्या मागितलेल्या जोगव्यावर पोट भरायचे. तुमच्या भाषेत इगो बाजूला ठेवून गरीब लोकांची दुःख समजून घ्यायची. आता तुम्ही जाताच ना ते चॅरिटी का काय साठी पैसे मागायला? मग देवाच्या नावाने मागितलं तर छिद्र पडतं का अंगाला?” (अशिक्षित अज्ञानी गरीब समाजाला उत्सवाच्या नांवाखाली लुटण्यासाठी रीतीरिवाज परंपरा संस्कार आहेत आणि त्यात शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान यांचा परिपूर्ण वापर करून )
“Right मम्मा, तो ‘फुलोरा’ का? त्यातली पापडी खूप आवडते मला.” श्रुतिकाचं डोकं आता शंकांनी भरलं होतं. आई हसून म्हणाली, “किती चौकशा त्या! अगं, मी म्हंटलं ना,रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो, मग दिवसभर शेतात राबायचं तर घरी काहीतरी कोरडा खाऊ असावा,मुलंही खातात. ते तुम्ही इव्हनिंग स्नॅक म्हणतात ना, तेच! आणि हो तेच त्याकाळचे chatting चे साधन होते फुलोरा लाटायला एकत्र आलेल्या बायकांना! Live whatsapp!” आई,कसले हुशार होते गं आपले पूर्वज! मग आता सांग, कुमारिकेची पूजा कशाला? आता मला का नाही बोलवत आणि, लहान मुलींनाच का?”
“वेडाबाई, प्रत्येक स्त्री मध्ये प्रचंड शक्ती आहे. ही देवीची रूपं त्याचीच जाणीव करून देतात, ती लहानपणीच करून दिली तर त्यांना गम्मत पण वाटते आणि आपण काही तरी भारी करू शकतो हे त्यांच्या मनावर ठसतं.पूर्वी,लवकर लग्न व्हायची,पाळी यायच्या आधीच, त्यामुळे कुमारिका ह्या छोट्याच असायच्या एवढंच! ते काय तुम्ही म्हणता ना toddler, teenager वैगेरे त्यांचं मोटिवेशन गं” आई.
“आयला, सॉरी, म्हणजे कमाल ग आई. प्रत्येक दिवसाला आणि सणाला काहीतरी आधार आहे.आता लास्ट,ते धान का धाण म्हणजे तो तुरा लावून का जायचं सीमोल्लंघनाला?” श्रुतिकाची प्रश्नावली सम्पणार म्हणून आईने हुश्श केलं. “मी म्हंटल ना, टेस्टिंग किट मधलं कुणाचं बियाणं चांगलं आहे हे त्या दिवशी कळतं मग, तुमची काय ती पायलट स्टडी गं!” श्रुतिकाच्या डोळ्यातली चमक आईला बरच काही सांगत होती.आणि आई,मला माहित आहे,दसरा म्हणजे,आपल्यातल्या रावणाला किंवा दुर्गुणांना,रामाने म्हणजे सद्गुणांनी जिंकायचं आणि ते हृदयापासून करायचं म्हणून हृदयाच्या आकाराची आपट्याची पानं प्रतीक म्हणून लुटायची,बरोब्बर ना?. “म्हणूनच तुला सांगते, भारतीय संस्कृती, right choice है बेबी.” आई
आज आईने सुप्त कल्पकता वापरून तिच्यातल्या सरस्वती आणि श्रुतिकामधल्या दुर्गाचा नवरात्रा निमित्त शास्त्रीय जागर केला होता.©️®️डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर यांची ही रिपोस्ट, हेतू एवढाच की कुणाच्याही मनात आपण करतो ते सणवार कुठलाही शास्त्रीय आधार नसलेले आहेत असा विचारही येऊ नये.असे त्या ठासून सांगतात, लिहतात. आधुनिक तंत्रज्ञान गुगलचा वापरून करून आजच्या उच्चशिक्षित मुलामुलींना हे सांगितल्या जाते. ते सत्य की असत्या यांचा कोणताही विचार न करता हे नवरात्र उत्सव गल्ली बोळात केले जातात. कोणता ही संदर्भ कुठेच जुळत नाही. तरी हजारो वर्षा पासून रीतीरिवाज परंपरा च्या नांवाखाली हे उत्सव उत्स्पुर्तपणे चालले आहेत.धंदा आहे,मार्केटिंग आहे. असे लिहल्यास कोणाच्या भावना दुखावतील म्हणून सत्य बदलणार नाही. विद्युत कंपनीत काम करणाऱ्या इलेक्ट्रिक इंजिनिअर ने हो पोस्ट मला पाठवली आणि अनेक प्रश्न विचारले. तेव्हा मी हे संकलन करून लेख लिहला.त्याला हाच प्रश्न विचारला “आजची उच्चशिक्षित मुलगी आईला हे का विचारत नाही?.” यार मी यांचे उत्तर देऊ शकत नाही.तूच काय ते लिह आणि दे वाचकांना.म्हणूनच हा प्रासंगिक लेख प्रपंच केला.यावर मोबाईल कॉम्पुटर इंटरनेट वापरणाऱ्या वाचकांनी आपल्या मुलामुली सोबत मैत्रीपूर्ण चर्चा करावी. सत्य आणि असत्य कसे ओळखावे यांची माहिती द्यावी.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.