Home महाराष्ट्र दिक्षाभूमीवर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?

दिक्षाभूमीवर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?

191

 

सम्राट अशोक धम्म विजया दिन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जगाच्या नकाशावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म दीक्षा सोहळयाचा ऐतिहासिक इतिहास नोंदविला गेला आहे. तो दरवषी विजया दशमीला नागपुरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. देशात असा कोणताही नेता व संघटना,पक्ष नाही की त्याला हजार दोन हजार लोक गोळा करण्यासाठी हंड्बील, पोस्टर, जाहिराती देऊन मिटींगा घ्याव्या लागतात तेव्हा मोठ्या मुश्किलीने लोक गोळा होतात.त्यांना वाहनाची, चहा, पाणी आणि जेवणाची व्यवस्था करावी लागते. देशात नव्हे तर जगात एकच व्यक्ती अशी आहे कि त्याच्या प्रतिमेला त्यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी, सलामी देऊन नतमस्तक होण्यासाठी नागपुरात गेल्या ६७ वर्ष लाखोच्या संख्ये लोक येतात. त्यासाठी त्यांना कोणताच नेता हंड्बील पोस्टर कडून येण्याचे आमंत्रण निमंत्रण देणारे आवाहन करीत नाही तरी लोक लाखोच्या संख्येने येतात.त्या लाखो लोकांचे नेतृत्व कोणीच करीत नाही. सर्वच स्व्यमघोषित नेते कार्यकर्ते असतात.

१ जानेवारी शौर्य दिन भिमा कोरेगांव, अशोक विजया दशमी नागपूर, २० मार्च चवदार तळे महाड आणि ६ डिसेंबर चैत्यभूमी दादर मुंबई येथे येणारी गर्दी कोणाच्याही नियंत्रणात नसल्यामुळे सरकारला खूप काळजी पूर्वक परिस्थिती हाताळावी लागते.त्यामुळेच प्रशासन अधिकारी दरवर्षी लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल यांचेच नियोजन करीत असतात.रोड बंद,पार्किंग बंद, जाणूनबुजून या असंघटीत समाजाला त्रास देण्यासाठी किंवा जातीय दंगल घडविण्यासाठी अनेक षड्यंत्र केली जातात.त्यातच घरका मुदयी लंका ढाये,कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बारा.दरवर्षी मान्यताप्राप्त नेत्यांच्या विरोधात समाजात असंतोष निर्माण करून शॉटकट नेते बनणारे काही कमी नाहीत.सम्राट अशोक धम्म विजय दिनाच्या पूर्व स्नाध्येला अनेका विषयी नको ते शब्द व्यक्त करून शब्द स्पोट घडविण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे नेहमी सारखा नागपुरांच्या दिक्षाभूमी वर भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?.ही होणारच असे ठरलेले असते.

मागासवर्गीय समाजातील भक्त मंडळी महापुरुषांचे जन्मदिन आणि स्मृतीदिन आल्यावर भरभरुन अभिवादन करायला लागतात. मी पण १९८२ पासून १९९४ पर्यत नागपूर, मुंबई बुक स्टोल लावून पुस्तके विकत होतो. दादरच्या शिवाजी पार्क मध्ये चष्मा तपासणी शिबीर,आरोग्य तपासणी शिबीर, जनजागृती साठी पत्रक वाटप असे काम दरवर्षी करत होतो. कालकथीत विजय गोविंद सातपुते यांच्यामुळे कॉम्रेड शरद पाटील यांच्या संपर्कात आल्यानंतर खरी परीस्थिती आणि मूळ समस्या व त्या समस्यांचे मूळ कारण लक्षात येऊन त्या दृष्टीकोणातून फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीची क्रांतिकारी विचारांची खरी ओळख पटू लागली. मग हे एक दिवसाचे भावनिकदृष्ट्या दाखवल्या जाणारे प्रेम, अभिवादन, त्रिवार वंदन ह्या गोष्टी बनावटी वाटून चीड निर्माण करु लागल्या.कारण ह्यामुळे महापुरुषांना अपेक्षित बदल होणं तर दूर उलट त्यांच्या विचारधारेचा पराभव होऊन त्यांच्याच समतावादी विचारांची हत्या होऊन विषमतावादी विचारधारेचा विजय होतांना दिसत आहे.नागपूरच्या दिक्षाभूमी वर होणाऱ्या प्रत्येक कार्यकमात आर एस एस प्रणित नेत्यांचे उपस्थिती आणि आदरतिथ त्यातून राज्यात देशात जाणारा संदेश हा भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या? करणारा आहे.नव्हे असतोच.

“मेरा जीवन ही मेरा संदेश है!” हे शंभर टक्के सत्य असतांना त्यांच्या नावाचा जयजयकार करण्यावर भर दिला जात आहे. आपल्या प्राणांची बाजी लावून माझे अपूर्ण कार्य पूर्ण करा. “जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा.” असे सांगणाऱ्या बाबासाहेबांच्या आयुष्याचा खराखूरा अभ्यास केलात तर जाणवते,त्यांनी त्यांच्या जीवनात मानलेले तीन गुरु बुद्ध-कबीर- फुले यांचा जयजयकार न करता त्यांच्या विचारांचे आयुष्यभर अनुकरण करत त्यांचे सामाजिक कार्य पूर्णत्वास नेले.ही कोणत्या ही अनुयायाने आपल्या महापुरुषाला दिलेली खरी व प्रामाणिक प्रेरणादायी मान वंदना,श्रद्धांजली किंवा आदरांजली असते. बाकी सगळं प्रचंड ढोंग असते व स्वताचा स्वार्थ संभाळत केलेली तडजोड असते.खरे प्रबोधन व अनुकरण समजून घेण्यासाठी बाबासाहेबांच्या सामाजिक गुरुंच्या आयुष्यातले अनेक महत्वपूण प्रसंग वाचले तर प्रेरणा देतात. बाबासाहेबांनी आम्हा पाच्यांशी टक्के बहुजनांना संख्यावार प्रतिनिधीत्व व मानवी हक्क-अधिकार देण्यासाठी मनुस्मृती विरोधात “लोकशाही व संविधान” भारतात आणण्यासाठी वेळप्रसंगी स्वताची पत्नी व मुले,सुखसोई त्यागून आयुष्यभर जनजागृती,समाजप्रबोधन,संघटीत जात दांडगे धनदांडग्याच्या विरोधात असंघटीतांना संघटीत करून अभ्यास करून संघर्ष केला. आज दिसणारा साधन-संपन्न एस सी,एस टी,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाज निर्माण केले.अन्यता शुद्र, अतिशूद्र आणि अस्पृश समाज माणूस मानून जगण्याच्या लायकीचा सुद्धा नव्हता. तो समाज आता लोकशाही व संविधान कमकूवत करत असलेल्या ब्राम्हणशाहीची वाढती “गर्वसे कहो हम हिंदू है” ही गुलामी पत्कारून बहुजन समाजातील महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांना पराभूत करून भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?. करीत नाही काय?.

महापरीनिर्वाण दिनाला, शौर्य दिनाला, धम्मचक्र अशोका विजया दशमी दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी निवडणूकीत कोणत्या ही मतदारसंघात संख्येच्या बळावर खरी का उतरत नाही.यांचे चिंतन कोणता ही नेता कार्यकर्ता करतांना का दिसत नाही. म्हणजेच ही वेगवेगळ्या दिनाला दिसणारी भक्तांची गर्दी भक्तांच्या गर्दीत क्रांतिकारी विचारांची हत्या?करणारी आहे.हे सिद्ध होते. यावर वैचारिक विचारमंथन झाले पाहिजे. चर्चा, संवाद परिसंवाद होऊन योग्य मार्ग काढला पाहिजे. अन्यता असे दिन येत राहतील आणि गर्दी वाढत जाईल.

सागर रामभाऊ तायडे,
भांडूप,मुंबई.
९९२०४४०३८५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here