Home खेलकुद  गुरुकुल कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

गुरुकुल कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

71

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.12ऑक्टोबर):-क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे व क्रीडा परिषद यवतमाळ यांच्या द्वारा आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत गुरुकुल कॉन्व्हेंट अँड ज्युनिअर कॉलेज, श्रीरामपूर पुसदच्या विद्यार्थ्यांनी मैदान गाजवले व त्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली.

ही स्पर्धा 9 व 10 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे जिल्हा क्रीडा संकुला मध्ये पार पडली. यामध्ये गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी 14 वर्षे वयोगटात लक्ष्मण गणेश खंदारे या विद्यार्थ्यांने 600 मीटर धावणे प्रथम क्रमांक, 400 मीटर धावणे द्वितीय क्रमांक व 100 मीटर धावणे द्वितीय क्रमांक पटकाविला आणि 17 वर्षे वयोगटात तिहेरी उडी मध्ये ऋषिकेश मनीष दशरथकर यांने प्रथम क्रमांक पटकाविला, भालाफेक स्पर्धेत माहेश्वरी विनोद नाळे हिने प्रथम क्रमांक व 4*400मी. रिले यामध्ये मोहन बीस्ट ,ऋषिकेश दशरथकर , शिवराज जाधव ,राज आसोले आणि आशिष चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकविला, तसेच 5000m चालणे या स्पर्धेत प्रवीण रामदास हुडेकर याने द्वितीय क्रमांक, 3000m. चालणे (मुली) या स्पर्धेत आर्या जाधव हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्व विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्तरासाठी झालेली आहे.शाळेचे कोच विक्रमसिंह राठोड यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.

शाळेचे संचालक कृष्णा शं. चापके व अनिता चापके, मुख्याध्यापक धनंजय चापके, क्रीडा मार्गदर्शक विक्रमसिंह राठोड व सर्व शिक्षक वृंद यांनी त्याचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here