विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक असुन सुतार समाजात ओबीसी, संविधान, जनगणना, आरक्षण इत्यादी विषयावर समाजातील समाज नेते खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन करीत नाहीत समाजातील नेते म्हणवुन घेणारे स्वयंघोषित नेतेमंडळी समाजात खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्पेशल अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळेच समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असते. सामाजिक, वैचारिक आणि नैतिक दृष्टीने समाजात विविध विषयांवर समाज जागृती, समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे ही प्रामुख्याने समाजाच्या नावाचा वापर करून समाजात नेतेगिरी करणाऱ्या समाज नेते म्हणून वावरणाऱ्या समाज नेत्यांची जबाबदारी असते. एकीकडे समाजाच्या नावाचा वापर करून समाज नेतेगिरी करायची आणि समाजात विविध विषयांवर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करायचे नाहीत. परिणामी समाजात खऱ्या अर्थाने वैचारिक दृष्टीने समाज जागृती निर्माण होत नाही, याला प्रामुख्याने सुतार समाजाच्या नावाचा वापर करून समाज नेतेगिरी करणारी तथाकथित स्वयंघोषित नेतेमंडळीच नैतिक दृष्टीने जबाबदार आहेत.हे मी जबाबदारी पुर्वकच लिहितो.
विज्ञानाचा वापर करून जग जवळ येत आहे. वर्तमानात प्रत्येकाच्या हातात स्मार्ट मोबाईल आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. काळ बदलत आहे,आपण ही बदलले पाहिजे,नाही बदलले तर आपण संपून जाऊ. विज्ञानवादी तंत्रज्ञान शिकून घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच कोणत्याही समस्याचे उत्तर तो दोन सेकंदात मिळऊ शकतो. जग झपाट्याने बदलत असतांना ओबीसी विश्वकर्मीय सुतार समाज संभ्रमाच्या वातावरणात जगत आहेत. आणी कर्मकांड, अंधश्रद्धा यामध्ये गुरफटलेला आहे. विश्वकर्मीय सुतार समाज जात उपजाती मध्येच अडकलेला आहे. सुतार समाजात वेगवेगळे उपजातीचे लेबल लावलेले आढळते. उदाहरणार्थ झाडे सुतार, पांचाळ सुतार, अहिर सुतार इत्यादी याचा परिणाम ओबीसी सुतार कोणत्याही एकाच विचारधारेवर एकत्रित येत नाही हे वास्तव परिस्थिती आहे. त्यामुळेच तो कर्मकांड, अंधश्रद्धा यामध्ये गुरफटत आहे या बाबतीत समाज नेतेगिरी करणाऱ्या समाज नेत्यांनी ओबीसी सुतार समाजात खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे ही तर समाज नेत्यांची सामाजिक क्षेत्रात नैतिक जबाबदारीच असते. ओबीसी सुतार समाज सामाजिक, राजकीय क्षेत्रात अनेक गटा तटात विभागलेला आहे.तसाच तो वेगवेगळे विचारधारेच्या समुहात सुद्धा नामधारी आहे. लक्षवेधी संख्येने असून ही सुतार समाज विखुरलेल्या अवस्थेत आहे.सुतार समाजात भिन्न भिन्न विचारधारा आत्मसात करणारे गटा तटात असल्यामुळे त्यांच्या आचरणात फरक ठळकपणे दिसतो.वेगवेगळे समाज समूहाचे अनेक समाज नेतृत्व आणी असंख्य सामाजीक पदाधिकारी निर्माण होऊन ते समाजचे नेतृत्व करतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी असतात.
ओबीसी समाजाचे मात्र वेगळेच आहे. त्याचा परिणाम ओबीसी सुतार समाज एकत्रपणे,एका झेंड्याखाली, एका छताखाली, एका विचारधारे खाली जोडला जात नाही परिणामी ओबीसी सुतार समाजाला राजकीय हिस्सेदारीसाठी समाज एकसंघ नसल्याने अडचणी निर्माण होतात. पर्यायाने ओबीसी सुतार समाज शिक्षणासह सत्ता, संपत्ती व ज्ञान इत्यादी सामाजिक विकास, शैक्षणिक कल्याणकारी योजने पासून कोसो दूर आहे. व भविष्यात या गोष्टी पासुन मुकला जाण्याची भीती निर्माण होत आहे. याचा सुद्धा विचार ओबीसी विश्वकर्मीय सुतार समाजातील समाज नेत्यांनी करणे गरजेचे आहे.कोणत्याही समाजाचा विकास हवा असेल तर त्यासाठी समाजात एक विचार,एक ध्येय आणी एक उद्दिष्ट असणे गरजेचे असते त्या शिवाय समाज राजकीय क्षेत्रातील आपलं सामाजिक ते राजकीय अस्तित्व निर्माण करू शकत नाही. तसाच तो शैक्षणिक,सांस्कृतिक कला, क्रीडा कौशल, गुणवत्ता दाखविण्यात लायक असूनही ना लायक ठरत आहे. विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज एकत्र येणे काळाची गरज आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. या बाबतीत विश्वकर्मीय सुतार समाजात वैचारिक प्रबोधन समाज जागृतीचा अभाव जाणवतो. विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक असतांना दुसरीकडे सुतार समाजात विश्वब्राम्हण, पांचाळ ब्राम्हण आणी ओबीसी सुतार अशा प्रकारचे संभ्रमाचे वातावरण जाणवते. त्यामुळेच तो शिक्षणाकडे कमी आणि मंदिराकडे जात जाऊन पूजा अर्चा, उपास नवसात म्हणजेच कर्मकांड, अंधश्रद्धा यामध्ये गुरफटत आहे. तरुणपिढी ही उच्चशिक्षित असूनही रीतीरिवाज वर्डोपार्जीत परंपरा सोडण्याची हिंमत करीत नाही. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते फक्त दोन समाजात जाणल्या जाते. इतर ओबीसी एकाचा तिरस्कार तर दुसऱ्याच्या शब्दा बाहेर जन्मा पासून मरे पर्यंत जाण्याची हिंमत करत नाही. हे मला विश्वकर्मीय सुतार समाजात वावरतांना या बाबतीत मोठा संभ्रम जाणवतो यावर समाजातील समाज नेत्यांनी विचार मंथन करणे गरजेचे आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी बद्दल काही तरतुदी घटनेमध्ये केलेल्या आहेत आणी त्याच आधारे अनेक ओबीसी शिक्षण, नोकरी राजकीय क्षेत्रात मोठा लाभ घेतांना दिसतात. आपण काही प्रमाणात ओबीसी म्हणून लाभ घेत असतानाच दुसरीकडे मात्र विश्वब्राम्हण,पांचाळ ब्राम्हण म्हणून स्वतःला उच्चवर्णीय समजतात असा प्रकार बघायला मिळतो हा संभ्रम सुतार समाजातील समाज नेत्यांनी दुर करणे गरजेचे आहे. खरे तर विश्वकर्मीय सुतार समाज हा संवैधनिक दृष्टीने बाराबलुतेदारी मध्ये आणी ओबीसी प्रवर्गातील एक मोठा ओबीसी घटक आहे.हे सत्य नाकारून चालणार नाही. म्हणूनच मी म्हणतो काळ बदलला आपणही बदलले पाहिजे. परिवर्तन हा निसर्गाचा गुणधर्म आणि नियम आहे.आपण ही त्यानुसार वेळोवेळी बदल स्वीकारला पाहिजे. तरच आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवू शकतो.यावर समाज नेत्यांनी दुर्लक्ष न करता प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ओबीसी प्रवर्गातील घटक असतांना विश्वब्राम्हण आणी पांचाळ ब्राम्हण याला कोणताही संवैधानिक आधार नाही असे असतांना मग विश्वब्राम्हण किंवा पांचाळ ब्राम्हण अशी बिरुदावली लावणे कितपत योग्य होईल. याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे झाले आहे हा संभ्रम दुर करण्यासाठी तथाकथित स्वयंघोषित समाज नेत्यांनी संवैधनिक आधारावर सामाजिक क्षेत्रात प्रयत्न करणे गरजेचे आहे. विश्वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात अनेक सामाजिक संघटना, अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत आणी अनेक सामाजिक पदाधिकारी वर्ग सुध्दा कार्यरत आहेत. समाजात असंख्य प्रमाणात सुशिक्षित, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, बुद्धिवान वर्ग सुद्धा आहेत तसेच सामाजिक क्षेत्रात समाज नेतृत्व आणी युवा नेतृत्व अशी सामाजिक सन्मान जणक उपाधी धारक सुध्दा असतात त्या शिवाय सामाजिक पुरस्काराने सन्मानित पुरस्कार प्राप्त मान्यवर सुद्धा आहेत. मात्र कोणत्याही समस्या बाबत कोणाचेही एकमत नाही. समाजात सामाजिक क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेऊन काही जण विविध राजकीय क्षेत्रात पदार्पण करीत असल्याचे समजते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी वर्ग सुद्धा ओबीसी सुतार समाजात कार्यरत आहेत.
विश्वकर्मीय सुतार समाजात वरीलप्रमाणे सुशिक्षित, उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, राजकीय क्षेत्रातील मातब्बर, अनुभवी सामाजिक क्षेत्रातील दिग्गज, धुरंधर, मातब्बर आणी समाज नेतृत्व तसेच युवा नेतृत्व सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी असतांना मात्र आजपर्यंत गेली अनेक वर्षापासून हा सामाजिक दृष्टीने महत्वाचा प्रश्न सुटलेला नाही आणी या बाबतीत सुतार समाजात आजपर्यंत या विषयाला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे किंवा समाजात वैचारिक प्रबोधन, समाज जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. त्यामुळेच विश्वकर्मीय सुतार समाजात विश्वब्राम्हण, पांचाळ ब्राम्हण आणी ओबीसी सुतार या बाबतीत मोठा संभ्रम आणि संभ्रमाचे वातावरण आहे. या महत्वाच्या विषयावर समाजातील वैचारिक बुद्धीजीवी विचारवंतांनी खुले चर्चासत्र आयोजित करणे गरजेचे आहे. आणी या चर्चेत सामाजिक क्षेत्रातील सर्वंच सन्माननीय मान्यवरांनी सहभागी होऊन यावर सामाजिक दृष्टीने चिंतन मनन, विचारविनिमय करणे गरजेचे आहे. विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातीलच एक सहभागी ओबीसी घटक आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. विश्वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रातील सुशिक्षित, उच्चशिक्षित, समाज नेतृत्व आणी युवा नेतृत्वाखाली या बाबतीत सुतार समाजात जागृती करणे गरजेचे आहे. यासाठी वरील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेणे गरजेचे आहे त्या शिवाय समाजातील विश्वब्राम्हण, पांचाळ ब्राम्हण कि, ओबीसी सुतार समाज हा संभ्रम व संभ्रमाचे वातावरण सुतार समाजात दुर होणार नाही.
मी स्वतः ओबीसी सुतार असुन माझ्याकडे ओबीसी सुतार असल्याचा अधिकृत जातीचा दाखला आहे. त्या दाखल्यावर स्पष्टपणे ओबीसी सुतार असा उल्लेख आहे. असे असतांना मात्र विश्वकर्मीय सुतार समाजात विश्वब्राम्हण, पांचाळ ब्राम्हण असे संभ्रमात टाकणारे वातावरण का निर्माण केले जाते हेच समजत नाही. विश्वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रातील हा गैरसमज,संभ्रमाचे वातावरण दुर करण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा आहे.म्हणूनच मी सतत या विषयी तोडक्या मोडक्या वऱ्हाडी भाषेत लिहण्याचा प्रयत्न करतो.
दुसरी बाब अशी आहे कि, विश्वकर्मीय समाजात स्वतःला विश्वब्राम्हण किंवा पांचाळ ब्राम्हण म्हणुन कायदेशीर संवैधानिक दृष्टीने मान्यता आहे का? किंवा तशा प्रकारची संवैधानिक मान्यता मिळणार आहे का? याचा सुद्धा सामाजिक दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. समाजातील वरीलप्रमाणे सर्वंच सन्माननीय समाज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली या बाबतीत सामाजिक संभ्रम दुर करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कर्मकांड,अंधश्रद्धा, अंधविश्वास आणी इतर काही धार्मिकतेच्या बाबींचा विचार करता या बाबतीत सुध्दा समाजात वैचारिक प्रबोधन समाज जागृती होणे अत्यंत गरजेचेच आहे.विश्वकर्मीय सुतार समाजात सामाजिक सर्वांगीण विकासासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन महत्वाचा ठरतो, समाजाने कर्मकांड, कपोलकल्पित थोतांड, भ्रामक गोष्टी हद्दपार करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकरने गरजेचे आहे. सुतार कुशल कारागीर म्हणून दिवसभर राबराब राबतो,सुतार कारागीर इमानदारीने मेहनत करून आपल्या उदरनिर्वाहाचे संसाधन म्हणुन आर्थिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करतो.विश्वकर्मीय सुतार कारागीर राज्यभरात विस्तारलेला असुन मुळातच विश्वकर्मीय सुतार समाज कारागीर हा कलेत, कलाकुसर इत्यादी बाबतीत तरबेज आहे. आपण कष्टाने, मेहनतीने कमविलेला पैसा आपल्या कौटुंबिक मुलभूत गरजा भागविण्यासाठी खर्च झाला पाहिजे यावर सुतार समाजात वैचारिक प्रबोधन होणे गरजेचे आहे.
ओबीसी सुतार समाजाचा विकास वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेऊनच होऊ शकतो धार्मिकतेच्या, काल्पनिक, कपोलकल्पित इत्यादी विषयावर गुंतले तर समाज विकासात्मक दृष्टीने प्रगती करु शकणार नाही. या बाबतीत समाजात वैचारिक प्रबोधन, समाज जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. काल्पनिक थोतांड, कपोलकल्पित गोष्टी या बाबतीत सुद्धा समाजातील वरील मान्यवरांनी सुतार समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी समाज इमानदारीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात संत महापुरुषांच्या विचारांचा तसेच संवैधनिक विचारांचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे. ओबीसी सुतार समाजात पुरोगामी विचाराने, संताच्या आणि महापुरुषयांच्या विचाराने सामाजीक क्षेत्रात प्रगती करता येईल कि, धार्मिकतेच्या जोखडात अडकून, कपोलकल्पित, काल्पनिक थोतांड याचा आधार घेऊन सामाजिक प्रगती गाठता येईल याचा सारासार विचार वरील उल्लेखनीय मान्यवरांच्या नेतृत्वाखाली होणे गरजेचे आहे.थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपलं आयुष्य समाजाला सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी खर्ची घातले आणी ब्राम्हणांच्या विरोधाला न जुमानता महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपला समाज सुधारणेचा लढा मात्र सुरुच ठेवला होता.
महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारातील ईश्वर म्हणजे निर्मीक होय आणी निर्मीक म्हणजे जे सत्य आहे,जे वास्तवात आहे त्यालाच ज्योतीबा फुलेंनी आपला ईश्वर मानले आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपले गुरुस्थानी मानलेले होते यावरून विचार करणे गरजेचे आहे कि या महापुरुषांचे विचार किती महान आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानावर हा देश चालतो ना कि धार्मिक आस्थेवर देश चालतो तसेच अनेक महापुरुषांच्या विचारसरणीवर विचारधारेवर हा देश चालतो.
विश्वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील एक मोठा ओबीसी घटक आहे या बाबतीत सुतार समाजात समाज प्रबोधन, समाज जागृती होणे गरजेचे आहे. ओबीसी समाजाला ओबीसी बद्दल हक्क अधिकार हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाचा आधार घेऊनच मिळतात आणी आजही ओबीसी बद्दल हक्क अधिकार हे संवैधानिक मार्गाचा अवलंब करुनच ओबीसी संदर्भातील लढाई लढावी लागते.संविधाना शिवाय पर्याय नाही. वरील लेखा बाबतीत ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील वर उल्लेख केलेले सर्वच जबाबदार सन्माननीय समाज मान्यवरांच्या नेतृत्वाखाली विचार होणे गरजेचे आहे. विश्वकर्मीय सुतार समाज विश्वब्राम्हण, पांचाळ ब्राम्हण कि, ओबीसी सुतार या बाबतीत जे संभ्रमाचे वातावरण जाणवते त्यावर सामाजिक क्षेत्रात विचार होणे गरजेचे आहे. नैतिक दृष्टीने हि जबाबदारी समाज नेत्यांची आहे समाज नेत्यांनी मात्र विविध प्रकारच्या पळवाटा शोधुन जबाबदारी पासुन दुर जाऊ नये आणि समाजाची दिशाभूल करु नये.
सामाजिक वैचारिक आणि नैतिक दृष्टीने हा संभ्रम दुर करण्याची जबाबदारी समाजाच्या नावाचा वापर करून ओबीसी सुतार समाजात समाज नेतेगिरी करणाऱ्या समाज नेत्यांची आहे स्वतःला समाज नेतृत्व म्हणवुन घेणाऱ्या समाज नेत्यांची आहे हे मी एक ओबीसी सुतार समाजाचा घटक म्हणुन एक समाज बांधव म्हणुन जबाबदारी पुर्वकच लिहितो. राज्यस्तरीय सुतार समाजात समाजातील स्वतःला समाज नेतृत्व म्हणवुन घेणाऱ्या अथवा समाज नेतेगिरी करणाऱ्या बुद्धिप्रामाण्यवादी, बुद्धिवान सर्वच समाज नेत्यांनी नैतिक जबाबदारी म्हणुन ओबीसी, संविधान, जनगणना, आरक्षण इत्यादी विषयावर सुतार समाजात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे राज्यभरात आयोजन करून संवैधनिक पध्दतीने समाजात समाज प्रबोधन करणे गरजेचे असुन समाजातील संभ्रमाच्या बाबतीत संवैधनिक पध्दतीने गुंता सोडण्याची नैतिक जबाबदारी समाज नेत्यांची असते आणि हि जबाबदारी समाज नेत्यांनी स्वीकारावी तरच आपण नैतिक दृष्टीने ओबीसी सुतार समाजात समाज नेतेगिरी करण्यासाठी पात्र ठराल आणि अभिनंदनास सुद्धा पात्र ठराल.
प्रमोद सुर्यवंशी, चिखली मातृतीर्थ
बुलडाणा मो.-8605569521.