अमरावती ( वार्ताहर )
स्थानिक वऱ्हाड विकासच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ महिला व असंघटित घरेलू महिला कामगार यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजभूषण प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रमुख अतिथी माळी समाज ऋणानुबंधाचे उपाध्यक्ष श्री भरतराव खासबागे,कोषाध्यक्ष श्री ओमप्रकाश आंबेडकर,श्री रामकुमार खैरे,श्री वसंतराव भडके,श्री मधुकरराव आखरे, प्रा. एन.आर.होले, सुरेशराव मेहरे होते.
याप्रसंगी माळी समाज ऋणानुबंध परिवारातील सौ. सुनंदा बनसोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध संघटनांच्या वतीने अभिष्टचिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या.
ज्येष्ठ नागरिक सौ.रेखा रामलाल खैरे यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच असंघटित महिला घरेलू कामगार बानुबाई सलीम चौधरी यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वऱ्हाड विकासच्या माळी समाज ऋणानुबंध विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. भारतातील सर्वाधिक नोंदणी होणाऱ्या सर्व शाखीय माळी समाज उपवर युवक युवती ऋणानुबंध परिचय महासंमेलनासाठी निशुल्क नोंदणी करण्याचे आवाहन केले.
सौ. सुनंदा आखरे,पोलीस पाटील सौ.कविता नरेंद्र पाचघरे, सौ.मालती रवींद्र इंगळे (पाटील) सौ.कल्पनाताई नंदकुमार होले, डॉ. सौ.उज्वला सुरेशराव मेहरे, स्मिता संजय घाटोळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
श्री सुधीर घुमटकर यांनी आभार प्रदर्शन केले तर इंजि. वैष्णवी बोबडे यांनी संचालन केले.