धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर
धरणगांव – शहरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयात आजपासून शासकीय चित्रकला स्पर्धा एलिमेंट्री परीक्षेला सुरुवात झालेली आहे. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय या केंद्राचे केंद्रप्रमुख सौ. सुरेखा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनातून व कलाशिक्षक आर.एन.पाटील, सर्व चित्रकला विषय शिक्षकांच्या सहयोगाने अतिशय शांततामय वातावरणात परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू झालेली आहे.
परीक्षा चालू असतांना परीक्षा केंद्राला केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापिका सौ.सुरेखा पाटील मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात. एकूण २२ ब्लॉक परीक्षार्थीसाठी केलेले आहेत. एकूण एलिमेंट्री परीक्षेला ५४१ विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. तालुक्यातील या केंद्रावर २१ शाळेचा सहभाग आहे.
या शासकीय एलिमेंट्री चित्रकला स्पर्धेला संस्थेचे अध्यक्ष डी.जी.पाटील व सचिव आबासाहेब सी.के.पाटील यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.