कराड 🙁 दि. 27 सप्टेंबर , प्रतिनिधी) ” निसर्गाविषयी प्रत्येकाच्या मनात जागरूकता निर्माण झाली पाहिजे त्यासाठी एक सजग नागरीक म्हणून पर्यावरणाकडे बघणे गरजेचे आहे. निसर्गाचा केलेला अतोनात वापर आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय प्रश्न आणि निसर्गाला पोहोचत असलेली हानी यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांसंदर्भात आपण आपल्यापासून विचार करायला सुरुवात केली पाहिजे. मी आणि माझा निसर्ग वाचवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे झाडं लावली पाहिजेत, तसेच आज आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन आहे. आजच्या कालावधीमध्ये पर्यटन क्षेत्रात मोठ्या संधी आहेत याचा युवकांनी फायदा घ्यायला हवा”असे प्रतिपादन डॉ. श्रीमती एस. एम.राजहंस कृष्णा महाविद्यालय, रेठरे बु. यांनी केले. श्री शिवाजी शिक्षण संस्था उच्च ,शिक्षण मंडळ विद्यानगर ,कराडचे वेणूताई चव्हाण कॉलेज ,कराड व IQAC, भूगोलशास्त्र विभाग , निसर्ग मंडळ आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ओझोन डे व आंतरराष्ट्रीय पर्यटन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.निसर्ग ही एक मोठी प्रयोगशाळा आहे. निसर्गाकडे स्वयंशुद्धीकरणाची ताकद आहे. प्लास्टिकचा अतोनात वापर ,वन्य प्राण्यांचे संरक्षण ,रासायनिक द्रव्य ,ओझोन वायूचा रास अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.
या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ.एल जी जाधव सर यांनी हि मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री एस .जे. सकट ,भूगोलशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय डॉ. श्रीमती एस.एम.चव्हाण यांनी दिला. डॉ. श्रीमती एन. एस. देसाई यांनी आभार व्यक्त केले. कु. साक्षी पिसाळ-पाटील या विद्यार्थिनीने सुत्रसंचलन केले. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे,माननीय प्राचार्य, भूगोलशास्त्र विभागाचे प्राध्यापक, आणि विद्यार्थी यांच्या हस्ते भितीचित्राचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी डॉ. जे.यू दिक्षित, श्री.एम.एस.बागवान, श्रीमती थोरात तसेच बी.ए. भाग 1.2 व 3 व एम.ए.भूगोलशास्त्र या वर्गाचे विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.