Home महाराष्ट्र अंनिसच्या विटा शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. विश्वनाथ गायकवाड यांची तर कार्याध्यक्षपदी मुनीर शिकलगार...

अंनिसच्या विटा शाखेच्या अध्यक्षपदी प्रा. विश्वनाथ गायकवाड यांची तर कार्याध्यक्षपदी मुनीर शिकलगार यांची निवड

58

सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा.9075686100

म्हसवड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विटा शाखेच्या कार्यकर्त्यांची क्रांतिसिंह नाना पाटील वाचनालय येथे बैठक झाली. या बैठकीत अंनिसच्या शाखा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विश्वनाथ गायकवाड यांची निवड करण्यात आली. शाखेचे कार्याध्यक्ष म्हणून मुनीर शिकलगार यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सूर्यकांत पाटकुलकर व प्रधान सचिवपदी सदाशिव चव्हाण यांची निवड करण्यात आली.
इतर निवडी याप्रमाणे आहेत- मुरलीधर दोडके (बुवाबाजी संघर्ष कार्यवाह), संतोष माने (अं.नि. वार्तापत्र कार्यवाह), शीतल शिंदे (महिला विभाग कार्यवाहक), सुहासिनी शिंदे (महिला विभाग सहकार्यवाह), ॲड. संतोष शिंदे (कायदा विभाग कार्यवाहक), माणिक कांबळे (शिक्षक शिबिरे कार्यवाह), रेवणनाथ कांबळे (प्रसिद्धी विभाग कार्यवाह), गणेश धेंडे (विविध उपक्रम कार्यवाह)
ॲड. सुभाष पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व पुढील कामास सदिच्छा दिल्या.
या बैठकीला अंनिसचे जिल्हा सल्लागार समिती सदस्य ॲड. सुभाष (बापू) पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य वाघेश साळुंखे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रकाश शिंदे व कैलास सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here