✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.1ऑक्टोबर):- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धनकेश्वर ग्रामपंचायतीचे सचिव भारत श्रीराम गरड. यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे.
धनकेश्वर ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान. अंतर्गत राष्ट्र संत तुकडोजी ग्राम स्वच्छ स्पर्धा मध्ये जिल्हा प्रथम पारितोषिक, तालुका स्मार्ट ग्राम , जिल्हा स्मार्ट गाव, ग्रामपंचायत ला आय.एस.ओ. नामांकन, पेपरलेस ग्रामपंचायत, ग्रामपंचायत ला चंदेरी कार्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहे.
याच कार्याची दखल घेत ग्रामपंचायतीचे सचिव भारत गरड यांची राज्य आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.