✒️सचिन सरपाते(म्हसवड प्रतिनिधी)
म्हसवड(दि.30सप्टेंबर):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या कष्टातून देशाला धर्मनिरपेक्ष संविधान दिले.गरीब वंचित घटकाला आधार दिला.तथापि सध्या देशात अराजक सुरू आहे.धर्माच्या व जातीच्या भिंती मजबूत केल्या जात आहेत.आरक्षणाचा प्रश्नांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
या साठी देशाचे संविधान वाचविणे गरजेचे आहे.समाजवादाचा विचार सोडून भांडवलशाहीला पूरक धोरण राबविले जात आहे.देशाची लोकशाही वाचविण्याची हाक देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश आंबेडकर शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी दु.१ वाजता गांधी मैदान सातारा येथे संविधान बचाव सभा घेणार आहेत.
या सभेला माण खटाव सह सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी चे युवा जिल्हाध्यक्ष सनी तुपे यांनी केले आहे.