बळवंत मनवर/पुसद
पुसद येथील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या अखिरत नगर येथील रहिवासी राजू गंगाराम रावते वय 35 वर्ष या सुतार काम करणाऱ्या मिस्त्री ने काल दिनांक 27 सप्टेंबर 2023 चे दुपारी चार वाजता चे दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या साह्याने फाशी घेतल्याची घटना समोर आली आहे. राजू रावते याचा मृत्यू झाल्याने त्यांचे नातेवाईकाकडून सदरची घटना हत्या की आत्महत्या असा प्रश्न विचारत आहे. फाशीच्या घटनेवरून वसंत नगर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास करीत आहे.