अकलूज, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य आणि भारतीय दलित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कार्य केलेल्या खेळांडूचा नुकताच सन्मान करण्यात आला. यावेळी दिग्गज मान्यवर व संघटनेचे पत्रकार उपस्थित होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे त्याचबरोबर समाजाला सन्मानपत्र कार्याला उत्तेजित करणे या सहकारमहर्षींंनी सुरू केलेल्या परंपरेला अनुसरूनच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्य करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्याचा हा सोहळा कौतुकास्पद असल्याचे मत माळशिरस तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
प्रेस संपादक व सेवा संघ आणि भारतीय दलित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सन्मान सोहळा वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते शुभम प्रकाश क्षिरसागर नेमबाजी मध्ये नॅशनल पदक विजेता , अमिर मौला काझी शूटिंग हाॅलीबाॅल महाराष्ट्र संघाचे सात वर्षे कर्णधार, सुयश नारायण जाधव जलतरण पट्टू अर्जून पुरस्कार ,किरण प्रभू नवगिरे क्रिकेट पट्टू, निक्षित सुरेश खिलारे जिनमॅस्टिक , कोमल एकनाथ शिंदे दांड पट्टा क्षेत्रात पाच वेळा राष्ट्रीय सुवर्ण पदक या खेळाडूंना पुरस्कार देण्यात आला
यावेळी अंबादासजी सकट, प्रा बाळासाहेब लोखंडे, प्रा. रामलिंग साळवसकर, चंद्रकांत कुंभार माजी जि.प .सदस्य सुहास गाडे .अभिजीत मडावी .आदि उपस्थित होते.
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असला तरी समाजातील काही लोकांना वंचित ठेवले गेले आहेत अशाच लोकांसाठी भारतीय दलित संसद काम करीत असून आम्हाला संघटन उभा न करता चळवळ उभा करायची आहे. यामध्ये जाणीव असलेल्या लोकांनाच सहभागी करायचे आहे कारण जाणीव असलेले लोकच समाजासाठी काहीतरी करू शकतात. अशा जाणीव असलेल्या लोकांच्या मदतीने वंचितांसाठी करणार असल्याचे मत डॉ. अंबादास सकट यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील प्रा. रामलिंग सावळजकर प्रा बाळासाहेब लोखंडे प्रा अंबादास सगट, शशिकांत कडबाने, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सोलापूर जिल्हध्यक्ष सोमनाथ खंडागळे, पदाधिकारी नौशाद मुलानी, शिवाजी मोरे, संदीप भागवत, मारुती शिंदे, किरण येडगे, सुरज येडगे, जि प सदस्य सुहास गाडे आदी मान्यवर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ सोलापूर जिल्हा कार्यकारिणीने उत्कृष्ट कार्यक्रम राबविल्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यानी सोलापूर जिल्हा कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.
Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांच्या वतीने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान...