चंद्रपुर(प्रतिनिधी) दिनांक27/9/2023 केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेत देशभरात शाश्वत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहे. दिनांक 27 सप्टेंबरला स्वच्छता ही सेवा मोहीमे अंतर्गत पर्यटन स्थळांची स्वच्छता कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले होते, त्यानुसार जिल्यातील विविध पर्यटन स्थळांची स्वच्छता कार्यक्रम घेवून पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने मुल पंचायत समिती अंतर्गत सोमनाथ या पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमात जिल्हा स्तरावरुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता, नुतन सावंत यांनी स्वतः हजर राहुन उपक्रमात सहभागी झाल्या व सोमनाथ या पर्यटन स्थळांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवुन परिसराची स्वच्छता करण्यात आली. उपक्रमाची सुरवात मुल तालुक्यातील मारोडा गावात रॅली काढुन करण्यात आली . कलापथकाचे आयोजन करुन ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात ठिकठिकाणी पर्यटन स्थळांची स्वच्छता करण्यात आली असून, विविध ठिकाणी अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.यावेळी उपस्थित सर्वांना स्वच्छता शपथ देण्यात आली. परिसरात बेलाचे वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी मुल तालुक्यातील पर्यट्न स्थळ सोमनाथ येथे मुल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत,सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चणफ़णे,मारोडा गावचे सरपंच शेंडे,उपसरपंच नेरलवार, ग्रामपंचायत चे ग्रामसेवक,सदस्य,कर्मविर महाविद्यालयाचे मुल येथिल एन एन एस चे विद्यार्थी,नवभारत विद्यालय मुल येथिल एन सि सी चे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.