Home यवतमाळ उमरखेड तालुक्यातील पिरंजी गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने गावकरी व शेतकरी त्रस्त

उमरखेड तालुक्यातील पिरंजी गावाचा विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने गावकरी व शेतकरी त्रस्त

124

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.27 सप्टेंबर) तालुक्यातील पिरंजी गावामधे गेल्या अनेक महिन्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने गावातील ग्रामस्थ व शेतकरी परेशान झाले आहे.

विद्युत वितरण केंद्र, ढाणकी येथे असल्याने दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी गावकऱ्यांनी निवेदन देवुन सुद्धा विद्युत पुरवठा विभागाने कोणतीही दखल घेतली नाही.

गावातील चार,पाच दिवसापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना अशा अनेक अडचणीला समोर जावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

व सर्व गावकरी मंडळी व महिला मंडळी यांनी ही याप्रसंगी चव्हाण साहेब यांना निवेदन दिले.

चव्हाण म्हणाले की, दोन ते तीन दिवसात लवकरात लवकर पिरंजी गावाची लाईन सुरळीत करून देतो. तसेच गावा करिता लाईनमन यांची नियुक्ती करून देतो असे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here