चंद्रपुर(प्रतिनिधी) देशात मोठ्या उत्साहात स्वच्छता ही सेवा मोहिम 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2023 या कालावधित राबविण्यात येत असुन, या अंतर्गत शाश्वत स्वच्छता राखण्यासाठी या अंतर्गत विविध उपक्रम दररोज राबविल्या जात आहे. गाव स्तरावर प्रत्येक घरी जावुन कचरा संकलनाचे काम करणारे सर्व सफ़ाईमित्रांना चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे.
गावस्तरावर स्वच्छतेचे काम करणारे सफ़ाई कामगार दररोज गाव स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. दररोज कचरा संकलीत करणे. गावक-यांना स्वच्छते विषयी दररोज जागृक करुन, स्वतःही स्वच्छ राहुन गावात स्वच्छतेची ज्योत तेवत ठेवायच काम करत असुन , या सफ़ाई कामगाराचा ही सन्मान करुन ,यांना प्रोत्साहीत करण्यासाठी तालुका पातळीवर यांचा जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती अंतर्गत पंचायत समीतींच्या गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.या शिवाय सतत गावातील घाण साफ़ करुन गावात स्वच्छतेचे वातावरण निर्माण करत असतो . त्या साठी सफ़ाई काम करणा-या कामगाराच्या आरोग्याची तपासणी करण्याकरीता तालुकास्तरावर आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्यशिबिर आयोजित करुन, सर्व सफ़ाई कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. पंचायत समिती स्तरावर ठिक ठिकाणी झालेल्या आरोग्य शिबीराचा लाभ सफ़ाई कामगारांनी घेतला. हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये राबविण्यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यातुन चांगला प्रतिसाद मिळाला आहे.