✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो. 9823995466
उमरखेड (दि. 24 सप्टेंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ साजरा केला व आजच्याच दिवशी करिअर व रोजगार मार्गदर्शन एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम महाविद्यालयांमध्ये चालविण्यात येतात जसे श्रमसंस्कार शिबिर, ग्राम स्वच्छता, पशु चिकित्सा, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाव बेटी पढाव, विविध विषयावर पथनाट्य, उन्नत भारत अभियान, वृक्षारोपण कार्यक्रम, मतदान जनजागृती, महिला सक्षमीकरण, व्यक्तिमत्व विकास, ग्रामस्वच्छता इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतात.
24 सप्टेंबर 1969 रोजी महात्मा गांधीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने तेव्हाच शिक्षणमंत्री व्ही. के. आर.व्ही.राव यांनी देशातील 37 विद्यापीठांत प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय सेवा योजना सुरू केली. आज देशातील हजारो महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाले आहेत.
24 सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ म्हणून साजरा केला जातो.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 1969-70 मध्ये सुरू केलेली एक योजना. सुरुवातीस ही योजना सक्तीच्या राष्ट्रीय छात्रसेना योजनेचा पर्याय म्हणून सुरू झाली. राष्ट्रीय छात्रसेना दलात न जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने राष्ट्रीय सेवा योजनेत भाग घ्यावा. अशी अपेक्षा होती.
पुढे या योजनेतील फार मोठी आर्थिक जबाबदारी ध्यानात घेऊन प्रत्येक राज्यातील काही निवडक महाविद्यालयांपुरतीच ही योजना लागू करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करून त्यांना सामाजिक कार्याचा सराव करण्यास वाव देणे हे आहे.
महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करणे, क्रीडांगणे तयार करणे, ग्रामीण विभागातील रस्ते बांधणे, प्रौढ शिक्षण, गलिच्छ वस्त्यांची सफाई, प्रथमोपचार, नागरी संरक्षण इ. कार्यक्रमांचा या योजनेत समावेश आहे. 1976-77 पासून ग्रामीण विभागाची सुधारणा, तसेच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमजोर असलेल्या लोकांच्या विकासाची कामे यांवर भर देण्यात आला. या दृष्टीने ग्रामीण भागातील परिसराची सुधारणा व आरोग्य तथा कुटुंबनियोजन हे कार्यक्रम हाती घेण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. अर्चना मिटके, प्रा. एस. एस. इंगळे, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व प्राध्यापक, कार्यालय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.