✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
पुसद (दि. 22 सप्टेंबर) शहरातीलअत्यंत गर्दी व वर्दळीचे ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एका भरधाव ट्रायमिक्स ट्रकने महिलेस चिरडले. त्यामुळे काही वेळ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
फिर्यादी विशाल नंदकिशोर बरडे वय 36 वर्ष जात- भावसार, व्यवसाय प्रिंटींग दुकान रा.हनुमान वार्ड पुसद यांनी शहर पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला. त्यांनी माझ्या काकाची मुलगी माझी चुलत बहिण नामे एश्वर्या मधुसुदन बरडे वय 23 वर्ष रा. खतीबवार्ड पुसद ही घरून मोपेड टी.व्ही.एस. ज्युपीटर क्र. MH-29- B1- 8906 ने शिकवणी घेण्याकरिता करमनकर कोर्चिंग क्लासेस येथे जात होती.
दि. 20 सप्टेंबर 2023 चे 3:15 दरम्यान छञपती शिवाजी महाराज चौक येथे कॉक्रिट मिक्सर TMT टाटा कंपनीचे वाहन क्र MH-12-SF- 9852 वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन माझ्या चुलत बहिणीच्या मोपेड टी. व्ही. एस. ज्युपीटर क्र MH-29- BL- 8906 ला जोराने धडक दिली. तिच्या अंगावर वाहनाचे टायर जाऊन तो गंभीर जखमी झाली.
दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तीला उपचाराकरीता लाईफ लाईन हॉस्पीटल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी पुढील उपराकरिता नांदेड येथे रेफर केले आहे.
वाहन चालक नाम भारत ज्ञानदेव देवळे वय 25 वर्ष, रा. सोहळ ता कारंजा जि. वाशिम याने त्याच्या ताब्यातील मिक्सर वाहन IMT टाटा कंपनीचे क्र MH-12-SF 9852 हे रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन मोपेड टी. व्ही. एस. ज्युपीटर क्र MH-29- BL- 8906 ला जोराने धडक मारुन गंभीर जखमी करण्यास कारणीभूत झाल्याने त्याचेवर योग्य कार्यवाही होणे करिता पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला असुन पोलीसांनी ट्रक व वाहन चालकाला ताब्यात घेवुन पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.