Home यवतमाळ मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याची मागणी-उपोषण स्थळी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावण्याची मागणी-उपोषण स्थळी एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

94

 

✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि. 12 सप्टेंबर) मागील आठ दिवसापासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या अमरण उपोषणाला आता मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून हजारो महिला पुरुष व विद्यार्थी उपोषणकर्त्यांना आपला पाठिंबा देण्यासाठी व राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी उपोषण स्थळी येत असून सलग आठ दिवसापासून सुरू असलेल्या या आमरण उपोषण कर्त्यापैकी एकाची प्रकृती ढासळली असून त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

यातच आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणात उपोषण स्थळी महिला पुरुष व विद्यार्थी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी आले होते

यापैकीच जेवली येथील एक युवक अशोक देवराव जाधव व यंदाचे 35 हा देखील उपोषण स्थळी आला होता.

परंतु सदर युवकांन कोरंजन नावाचे कीटकनाशक प्राशन केले यावेळी उपस्थित त्यांनी याबाबतीत त्याला मज्जाव केला परंतु तोपर्यंत सदर युवकांनी काही प्रमाणात कीटकनाशक हे विषारी औषध घेतले होते.
त्यामुळे त्याला सर्वप्रथम उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे दाखल करण्यात आले होते.

येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय यवतमाळ इथे पाठविण्यात आले असून सदर युवकाला एक दहा वर्षाचा मुलगा असल्याची माहिती मिळाली.

या घडलेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी शांततेचे आव्हान यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here