_सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या लेखातील भावार्थ समजून घ्यायला हवा, अशी श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजींची विनंती आहे…. संपादक._
सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात, हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले. वंशपरंपरागत व्यवसायाचे ते वर्णन करत असत-
“आम्ही वारीक वारीक। करू हजामत बारीक।।
विवेक दर्पण आयना दाऊ। वैराग्य चिमटा हालऊ।।
उदक शांती डोई घोळू। अहंकाराची शेंडी पिळू।।
भावार्थाच्या बगला झाडू। काम क्रोध नखे काढू।।
चौवर्णा देऊनी हात। सेना राहिला निवांत।।”
संतश्रेष्ठ सेना महाराजांचा जन्म हा इश्वरी कृपेने झाला होता. सेना महाराजांच्या घरात सुरुवातीपासुनच विज्ञानवादी वातावरण असल्यामुळे बालपणापासुनच त्यांच्यावर समतावादी, वैज्ञानिक चिकित्सक संस्कार झाले होते. त्यांच्या घरी वडील देवीदासपंत, आई प्रेमकुंवरबाई व सेनाजी अशी मंडळी होती. सेनाजी हळूहळू वाढू लागले. वडीलांच्या सहवासात बुद्धी चौकस, चंचल, बौद्धिक चातुर्याचे संस्कार सेनाजींच्या मनावर होत होते. भजन, किर्तनातुन त्यांचे ज्ञान अधिकच वाढत होते.
मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा होता. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले असायचे अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते.
“जो हा दुर्लभ योगिया जनासी। उभाचि देखिला पुंडलीकापासी॥१॥
हारपलें दुजेपण फिटला संदेह। निमाली वासना गेला देहभाव॥२॥
विठेवरी उभा पंढरीचा राणा। सेना म्हणे बहु आवडतो मना॥३॥”
जिथे जन्मले, त्या मातीची ओढ लागली होती, म्हणून ते परतले. त्यांच्या पुनरागमनानतंर बांधवगडला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाचं रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा’ असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा; या दिवशी संतशिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते. अभंगातून ते लोकांना भक्तिमहात्म्य समजावून देत- करा हाचि विचार– संत सेना महाराज अभंग– ४७
“करा हाचि विचार। तरा भवसिंधु पार॥१॥
धरा संतांची संगती। मुखीं नाम अहोराती॥२॥
अजामीळ पापराशी। पार पावविलें त्यासी॥३॥
नका धुरें भरूं डोळा। सेना सांगे वेळोवेळां॥४॥”
संत नामदेव, संत नरहरीकाका सोनार, संत परिसा भागवत, संत जनाबाई, संत चोखोबा मेळा, संत सावतोबा माळी या संतांप्रमाणे संत सेना महाराजांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संत जनाबाईने सेना महाराजांचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. शिखांचा धर्मग्रंथ- गुरुग्रंथसाहिब या पवित्र ग्रंथात संत सेनांच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.
“मोक्ष आणि मुक्ति। हे तो तुम्हांसी आवडती॥१॥
एका नामावांचून कांही। नसे आवडी आम्हां पाही॥२॥
तुम्ही करावा जतन। तुमचा आहे ठेवा राखून॥३॥
सेना म्हणे देई भेटी। कृपावंता जगजेठी॥४॥”
संत सेना महाराजांच्या जन्मस्थळाबाबत, जन्मकाळाबाबत, अनेक अभ्यासक, संशोधकांमध्ये एकमत नाही. आजही त्याबद्दल अनिश्चितता आहे. शिवाय ते महाराष्ट्रीय की अमहाराष्ट्रीय या बाबतीतही अनेक मतभेद आहेत. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. त्यांची मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी काव्य रचना आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, परंतु मराठीच्या मानाने त्यांचे प्रमाण खुपच कमी आहे.
“जातां पंढरीसी सुख वाटे जीवा।। आनंदें केशवा भेटतांचि॥१॥
या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं। पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे॥२॥
ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें॥३॥
ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक। ऐसा वेणुनादी काला दावा॥४॥
ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर। ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें॥५॥
सेना म्हणे खूण सांगितली संतीं। यापरती विश्रांती न मिळे जीवा॥६॥”
गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप डोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चिंतनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अडकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुळातील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले. “जाता पंढरीसी सुख वाटे जीवा” असे म्हणत हे वारकरी संतश्रेष्ठ विठ्ठलचरणी लीन झाले. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा; या दिवशी संत श्री सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते. बांधवगड येथे सेना महाराजांचे स्मृती म्हणून काही बांधकाम अजूनही सुरू आहे. याशिवाय श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर बेलीचा महादेव मंदिरासमोर संतश्रेष्ठ सेना न्हावी महाराज समाधी मंदिर आहे. याठिकाणी त्यांचा समाधी उत्सव श्रावण पक्षामध्ये पंधरा दिवस साजरा होतो.
“समचरण विटेवरी। पाहतां समाधान अंतरी॥१॥
चला जाऊं पंढरीसी। भेटुं रखुमाई वरासी॥२॥
होती संतांचिया भेटी। सांगू सुखाचिया गोष्टी॥३॥
जन्ममरणाची चिंता। सेना म्हणे नाही आतां॥४॥”
!! संतश्रेष्ठ सेना महाराजांना पावन पुण्यस्मरण पक्षभर विनम्र अभिवादन !!
– संतचरणरज –
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
रामनगर वाॅर्ड नं.२०, गडचिरोली.
फक्त व्हॉट्सॲप- 9423714883.