Home महाराष्ट्र शिव परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने जनतेसाठी जीवन समर्पित करणार- पंकजाताई मुंडे

शिव परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने जनतेसाठी जीवन समर्पित करणार- पंकजाताई मुंडे

145

 

गंगाखेड( प्रतिनीधी )
भारतीय जनता पार्टीचे नेते स्मृतीशेष गोपीनाथराव मुंढे यांनी संपूर्ण जीवन जनतेसाठी अर्पण केल्यामुळे,शिव परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणातील शिवशक्ती माझ्यात संचारली असल्यामुळे शिव परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने जनतेच्या प्रति जनतेची सेवा करत जनतेला पाहिजे असलेले काम यापुढेही करत राहणार त्यातूनच माझे जीवन समर्पित करत राहणार असे मत भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस पंकजाताई मुंढे यांनी दि 10 सप्टेंबर रविवार रोजी शिवशक्ती परिक्रमा यात्रा गंगाखेड येथे आली असता या प्रसंगी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी मंचावर भाजपा कार्यकारिणी सदस्य तथा मा. नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे मा.सभापती जि. प.परभणी मा.श्रीनिवास मुंढे , जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे,भाजपा प्रदेश कार्यकारिणी मा.सदस्य व्यंकटराव तांदळे, विठ्ठलराव रबदडे, रिपब्लिकन पार्टीचे नेते डॉ.सिद्धार्थ भालेराव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बालाजी मुंडे, आदित्यनाथ मुंडे, भाजपाचे श्रीराम मुंडे, शिवसेनेच्या नेत्या सखुबाई लटपटे, जगन्नाथ आंधळे, ओबीसीचे लक्ष्मण लटपटे यांचीही उपस्थिती होती.

शिव परिक्रमा यात्रा परळीणीहुन आल्यानंतर महाराणा प्रताप चौकामध्ये मा.नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे यांच्या हस्ते पंकजाताई मुंडे यांचे जंगी स्वागत करतअसताना दहा जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.
या परिसरातील प्रत्येक जण पाहतच राहिला.महाराणा प्रताप चौकामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याकडे आल्यानंतर पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय समोर जाहीर सभेचे स्वरूप झाले.

याप्रसंगी मा.नगराध्यक्ष रामप्रभूजी मुंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिव परिक्रमा यात्रा परभणी मार्गे औंढा नागनाथ या ठिकाणी मार्गस्थ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here