Home अमरावती कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानने केले सत्काराचे आयोजन ...

कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानने केले सत्काराचे आयोजन सुदेश पद्माकर खंडारे चा मंत्रालयात सहा. संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

140

अमरावती (वार्ताहर )

गौरखेडा कुंभी,ता. अचलपूर येथील चि.सुदेश पद्माकराव खंडारे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत सहाय्यक संचालक श्रेणी १, आरोग्य व सुरक्षा कामगार मंत्रालय,महाराष्ट्र शासन या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्याच्या सत्काराचा
समारंभ संपन्न झाला.
डॉ.नंदकिशोर खंडारे यांच्या अर्जुन नगर येथील गृहालयी दि . ८ सप्टेंबर २०२३ ला संपन्न झालेल्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्री पुरुषोत्तम वनस्कर होते.शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,पुस्तके देऊन सत्कारमूर्ती चि.सुदेश पदमाकरराव खंडारे व वडील श्री पद्माकरराव खंडारे यांचा कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, उपेक्षित समाज महासंघातर्फे सत्यशोधक प्रा.श्रीकृष्ण बनसोड,श्री संत रविदास जीवन विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती तर्फे अध्यक्ष श्री अनिल भागवतकर, गणेश भागवतकर, प्रभाकरराव बुंदेले,श्री पुरुषोत्तम वनस्कर,प्रा. पी.जी.भामोदे,अशोकराव तायडे,
रविदासा विश्वभारती प्रतिष्ठानचे सचिव व गुरु रविदास मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री वासुदेवराव वानखडे,पांडुरंग धुमाळे,अरुण शेगेकर,डी.ए. पानझाडे,केशवराव ठोसरे,सौ.पुष्पाताई ठोसरे, सौ.मोनाली ठोसरे यांनी भावपूर्ण सत्कार केला.
सत्कार समारंभामध्ये अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी सत्कारमूर्ती चि.सुदेश खंडारे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या आदर्श विद्यार्थी जीवनावर आधारित ” गुणवंत विद्यार्थी ” या स्वरचित अभंगाचे सुमधूर स्वरात गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

” सुदेशचे हे यश दीर्घ
परिश्रमाचे फळ .”
– श्री पुरुषोत्तम वनस्कर
” सुदेशचे हे यश त्याच्या दीर्घ परिश्रमाचे फळ आहे.अशा प्रकारचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे म्हणजे यशस्त्री यांच्या जीवनात प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही.”असे विचार मा.पुरुषोत्तम वनस्कर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.
“उच्चपदी गेल्यावर आई- वडिलांना विसरू नये.”
– प्रा.अरुण बुंदेले
” चि.सुदेशला मिळालेले यश हे त्याची अभ्यासामध्ये असलेली जिद्द व चिकाटी आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वातील आदर्श विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांमुळे प्राप्त झालेले आहे.हा एक आदर्श गुणवंत विद्यार्थी असून तो जीवनात पुढेही भरपूर यश संपादन करेल यात शंका नाही.उच्च पदावर पोहोचल्यानंतर आई-वडिलांना त्याने विसरू नये कारण मातापित्यांचे ऋण आपण सात जन्मातही फेडू शकत नाही.हे सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे .” असे विचार प्रमुख अतिथी अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले.
” सुदेशचे शैक्षणिक
जीवन आदर्श ”
– श्री अशोक तायडे
” सुदेश शैक्षणिक जीवनाचा योग्य प्रकारे उपयोग करून आज या उच्च पदावर पोहोचला आहे.त्याचे शैक्षणिक जीवन आदर्श आहे.त्याचे मार्गदर्शन इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.सामाजिक बांधिलकी स्वीकारून नोकरी सोबतच त्याने समाजसेवा करावी.सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजक प्रा.अरुण बुंदेले आपल्या प्रतिष्ठान द्वारे कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती परितोषिक व कै. बाबारावजी बुंदेले स्मृती पारितोषिक रोख रक्कम, सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह व ग्रंथ बक्षीस देऊन दरवर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतात हा त्यांचा उपक्रम अभिनंदनीय व आचरणीय आहे.”असे विचार प्रमुख अतिथी श्री अशोक तायडे यांनी व्यक्त केले.
” सुदेशने उच्च शिखरे
पदाक्रांत करावी.”
– डॉ.नंदकिशोर खंडारे
” एम.पी.एस.सी.मध्ये जसे यश संपादन केले तसेच यापुढेही असंख्य शिखरे पदाक्रांत करून पदाचा उपयोग समाजाच्या उद्धारासाठी करावा आणि युवा पिढीचा मार्गदर्शक म्हणून पुढे यावे.”असे विचार प्रमुख अतिथी डॉ.नंदकिशोर खंडारे यांनी व्यक्त केले.
“सुदेशाचे यश विद्यार्थ्यांना प्रेरक”
– श्री वासुदेव वानखडे
” सुदेशने जे यश संपादन केले ते अनमोल आहे.समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरक आहे.त्याच्या मार्गदर्शनाने समाज युवक जीवनात चांगले यश संपादन करू शकतात.सुदेशला पुढील जीवनासाठी शुभेच्छा .”असे विचार प्रमुख अतिथी श्री वासुदेव वानखडे यांनी व्यक्त केले.

” सुदेशचा आदर्श युवापिढीने घेऊन यशोशिखर गाठावे.”
-प्रा.श्रीकृष्ण बनसोड
” सुदेश खंडारे या युवकाने एम.पी.एस.सी.परीक्षेत जे घवघवीत यश संपादन केले त्याचा आदर्श आजच्या युवकांनी घेऊन सततच्या परिश्रमाने यशोशिखर गाठले पाहिजे.”असे विचार प्रमुख अतिथी प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी व्यक्त केले.
“सुदेशचे यश हे दीर्घ
परिश्रमाचे फळ”
– प्रा.पी.जी.भामोदे
” सुदेश ने अभ्यासावरुन लक्ष विचालित होऊ न देता MPSC च्या परीक्षेत यश संपादन केल्यामुळे मंत्रालयात सहा.संचालक पदी नियुक्ती झाली.त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजापुढे त्याने जो हा एक आदर्श निर्माण केला तो महत्वाचा आहे.त्याचे हे दीर्घ परिश्रमाचे फळ आहे “असे विचार प्रमुख अतिथी प्रा.पी.जी.भामोदे यांनी व्यक्त केले.
” स्पर्धा परीक्षेसाठी नियोजबद्ध पद्धतीने अभ्यास करण्याची गरज ”
सत्कारमूर्ती चि.सुदेश खंडारे

” मला सत्कारायोग्य समजल्याबद्दल धन्यवाद.ज्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची असेल अशा प्रत्येक विद्यार्थ्याने सर्वप्रथम योग्य ते क्षेत्र निवडून आपली पदवी पूर्ण करावी.सोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा कारण आजचे युग स्पर्धेचे युग आहे.स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे.या स्पर्धेत स्वतःला टिकून ठेवणे महत्त्वाचे आहे त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास केला पाहिजे तर यश हे हमखास मिळते.”असे विचार आपल्या मनोगतात सत्कारमूर्ती चि.सुदेश पद्माकरराव खंडारे ने व्यक्त केले.
डॉ.गजानन चंदनकर यांनी संचालन केले तर सुकेश खंडारे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ.नंदकिशोर खंडारे,श्री ओंकारराव खंडारे, सुकेश खंडारे,सुरेश खंडारे,सौ. सोनूताई खंडारे,सौ.शुभांगी चंदनगोळे,सौ.रश्मी खंडारे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here