नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-: ज्ञानार्जनानेच मानवाचा सर्वांगीण विकास शक्य झाला आहे.शिक्षित बनून सुसंस्कृत मानवी जीवन जगण्यासाठी सातत्याने ज्ञानप्राप्ती करता सातत्य,मेहनत,जिद्द-चिकाटी विद्यार्थ्यांनी विकसित केली पाहिजे असे मत समता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एल.जाधवसर यांनी व्यक्त केले.
७ सप्टेंबर १९६५ रोजी युनेस्कोने घोषित केल्या प्रमाणे ८ सप्टेंबर १९६६ पासून जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो.शिक्षण,विज्ञान व सांस्कृतिक विकास ह्या त्रिसूत्री वर आधारित विद्यार्थी-नागरिकांचा विकास साधने हा उदात्त हेतू युनिस्को हाती घेऊन जगाला ज्ञान-विज्ञान व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा आग्रह केला आहे तोच जगास तारक असल्याचे मत ह्यावेळी बोलतांना शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.
विद्यालयात संपन्न झालेल्या जागतिक साक्षरता दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद शेजवळ सर,सूत्रसंचालन व आभार हिरामण पगार सर यांनी मानले.हरिभाऊ सोनवणेसर,हरिभाऊ भागवतसर,विनोद सोनवणेसर, बाबासाहेब गोविंदसर,शिक्षकेत्तर कर्मचारी ज्ञानेश्वर झालटे,लक्ष्मण दाणे व विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home Breaking News ज्ञानार्जनानेच मानवाचा सर्वांगीण विकास : जी.एल.जाधव समता माध्यमिक विद्यालयात जागतिक साक्षरता दिन...