रोशन मदनकर, उपसंपादक मो. 88886 28986
ब्रम्हपुरी (दि. 7 सप्टेंबर):-
नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय ब्रम्हपुरी येथे दि.6.9.2023बुधवार ला श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा दहीहंडी कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी सन्माननीय अशोक भैय्या साहेब ,सचिव ने.भैय्या हि.शि .संस्था ब्रम्हपुरी, स.मुख्याध्यापिका सौ बनपुरकर मॅडम,स.उपमुख्याध्यापक श्री भैय्या सर ,स. पर्यवेक्षक श्री निखारे सर ,तथा समस्त शिक्षक शिक्षिका कर्मचारी वर्ग विद्यार्थी नी पालक वर्ग यांची उपस्थिती होती.
यानिमित्ताने इ. 5वीसाठी राधा ,कृष्ण वेशभुषा व इ.6ते8साठी मटका सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. भाद्रपद महिन्याच्या,कृष्ण पक्ष्याच्या आठव्या दिवशी रोहिणी नक्षत्रात जन्मलेले हे बाळ म्हणजेच कन्हैया,श्याम गोपाळ, केशव, द्वारकेश . द्वापार युगातील एक आदर्श तत्वज्ञानी. भगवतगीता म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजही जगभरात लोकप्रिय आहे. लोणी चोरून ज्यांनी खाल्ले
बासरी वाजवून ज्यांनी नाचवले
आनंद साजरा करूया त्यांच्या वाढदिवशी ज्यांनी जगाला सत्य आणि प्रेम शिकवले. वेद ,ज्ञान , विनय, विदवत्ता ,शौर्य, पराक्रम औदार्य, दूरदृष्टी, तेज , व्यव्हार चातुर्य, अनासक्तपणा अशा गुणमंडीत विभुतीचा हा सन्मान आहे . दहिहंडी चा उत्सव हा प्रथमच नियोजीत करण्यात आलेला होता.मोठ्या आनंदाने व हर्षोत्सवाने आसमंत फुललेला होता.गोविंदा पथक सज्ज झालेला ,आकर्षक सजावट,नेत्रसुखद मटकीचीं आरास मनाचा वेध घेत होती. निर्भया गोविंदा पथकाची एका दिमाखदार पध्दतीनेमैदानात आगमन झाले. टाळ्यांचा नाद घुमत राहीला आणि सुरू झालाय एक विलोभनीय नुत्य आविष्कार शोर मच गया शोर आया माखन चोर, गो गो गो गोविंदा गोविंदा रे गोपाळा च्या तालावर दमदार थिरकणारे गोविंदा पथक. आज वातावरण गोकुळमय वृदांवणमय,मथुरामय , द्वारकामय झालेले होते . कान्हाने दहिहंडी फोडली ,विविध रंगांची उधळण झाली, दहिकाला आणि गुलालानी परीसर बहरून गेलाय. नवचैतण्य,उत्साह नी उमेद सदैव जीवनात भरा आणि आनंदाने एकात्मता ,सहकार्य, प्रेमाची ताकद ओळखा हाच संदेश यातुन मिळाला .सर्वांच्या सहकार्याने सोहळा संपन्न झाला .