जगदीश का. काशिकर, ९७६८४२५७५७
धुळे – संपुर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेल्या लिटल मिलेनियम स्कूल संस्थेतर्फे, नुकतेच बेस्ट टिचर पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्या शिक्षक शिक्षिकांनी उत्तम कामगिरी व चांगले कार्य केले आहे. शिक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केला होता. हा पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांचा उपस्थित सिम्बायोसिस ऑडीटोरियम पुणे येथे संपन्न झाला. त्यात धुळे शहरातील लिटल मिलेनियम स्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना बेस्ट टिचर हा पुरस्कार देण्यात आला. संपुर्ण धुळे जिल्हयातून सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांची या टिचर एक्सलेन्स ॲडवार्ड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार लिटल मिलेनियम संस्थेचे अध्यक्ष साजिद अली, गितिका बहुगुणा, महाराष्ट्र यांच्या हस्ते देण्यात आला. लिटल मिलेनियम स्कूल, धुळे शाळेचे चेअरमन श्री. राजेंद्र उर्फ मुन्नाभाउ कटारिया, प्रसन्न कोटेचा, महाटा सर यांचे तसेच शाळेतील मुख्याध्यापिका सौ. भक्ती शहा, उन्नती सुराणा, भाग्यश्री अहिरराव, एकता लहामगे यांचे सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना अनमोल सहकार्य लाभले.