Home महाराष्ट्र भाजपा महिला कडून रक्षाबंधन अतुलभाऊना आमदार होण्याच्या शुभेच्छा

भाजपा महिला कडून रक्षाबंधन अतुलभाऊना आमदार होण्याच्या शुभेच्छा

120

🔸विविध क्षेत्रातील मान्यवरांना राखी बांधून भाजपा महिला मोर्चाचे रक्षाबंधन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.5सप्टेंबर):-दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोज सोमवारला भारतीय जनता महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. वंदना अरुण शेंडे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रातील बंधू आणि भगिनींना रक्षाबंधन करून नवा आदर्श निर्माण केला आहे. यामध्ये पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथे ठाणेदार मा. सुधाकर आंबोरे आणि कर्मचारीवृंद, ब्रह्मपुरी तहसील कार्यालयाच्या कर्तव्य कुशल तहसीलदार मा.उषा चौधरी आणि वरिष्ठ कर्मचारी वृंद, तसेच तालुका कृषी अधिकारी मा.स्वाती घुले आणि त्यांचे कर्मचारीवृंद, आणि ब्रह्मपुरी शहरातील रिक्षा चालक बांधवांना राखी बांधून भाजपाच्या बहिणींसोबत सदैव आपण राहावेत, असा आशीर्वाद घेतला.

यानंतर भाजपा कार्यालयात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांना रक्षाबंधन करून, भाऊ आपणच भविष्यातील आमदार..आम्हचे प्रेम आणि आशावादच आपणांस निवडणूक जिंकून देईल. अशा भावना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.. यावेळी भाजपा ओबीसी प्रदेश सदस्य प्रा. प्रकाश बगमारे, तालुकाध्यक्ष प्राचार्य अरुण शेंडे, शहराध्यक्ष, इंजिनियर अरविंद नंदुरकर,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रा.रामलाल दोनाडकर, भाजपा ओबिसी मोर्चा शहराध्यक्ष प्रा. डॉ.अशोक सालोटकर, तालुकाध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी प्रेमलाल धोटे, आदिवासी आघाडी तालुकाध्यक्ष राजेश्वर मगरे,भाजपा शहर महामंत्री मनोज भूपाल, युवा नेते साकेत भानारकर, जिल्हा सचिव तनय देशकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरदादा सातपुते,विजय जिभकाटे,सुभाष नाकतोडे, गोपाल ठाकरे उपसरपंच जुगनाळा, रामभाऊ निहाटे, पंकज माकोडे, सुरेश बनपुरकर इत्यादी उपस्थित भाजपा बांधवांना रक्षाबंधनाच्या बंधनात,राखी बांधून अडकवून घेतले.

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. वंदनाताई शेंडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्षा एड. दिपालीताई मेश्राम, मंजिरी राजनकर जिल्हा सचिव भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर,शिलाताई गोंधोळे तालुकाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा ब्रह्मपुरी तालुका, उर्मिलाताई धोटे माजी पंचायत समिती सदस्या, डॉ.हेमलता नंदुरकर माजी नगरसेवकी, नलिनीताई बगमारे,वर्षाताई चौधरी,विभाताई सुभेदार,आशाताई गोंगले इत्यादींनी हा कार्यक्रम परिश्रमपूर्वक यशस्वी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here