✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.3सप्टेंबर):-वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून याला जबाबदार केंद्रातील भाजप आणि राज्यातील ED सरकार आहे. या सरकारच्या हुकुमशाही धोरणामुळे अनेक स्वायत्त संस्थांचे अधिकार हिरावल्या जात असून त्यामुळे संविधानाची पायमल्ली केल्या जात आहे. जाती जातीत – धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. यामुळे विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी, लघु व्यापारी, सर्व त्रस्त असून या हुकमशाही सरकारच्या हिटलरशाही धोरणाचा परदाफास करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस च्या वतीने राज्यभरात जनसंवाद पदयात्रेला 3 सप्टेंबर पासून सुरुवात झाली.
या पदयात्रेचा भव्य शुभारंभ गडचिरोली जिल्ह्यात विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक मार्कडा येथून जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात झाला. विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक नगरी मार्कडा पदयात्रेला हिरवी झेंडी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी राज्यमंत्री मारोतराव कोवासे यांनी दाखवली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. नामदेवराव उसेंडी, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, नितीन कोडवते, चंदा कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, माजि. जि प. सदस्य कविता भगत, माजी जि. प. वैशाली ताटपल्लीवार, राजेश ठाकूर, अब्दुल पंजवाणी, वामन सावसाकडे, रमेश चौधऱी, भारत येरमे, दत्तात्रय खरवडे, रूपेश टिकले वसंत राऊत, नीलकंट निखाडे, दिवाकर निसार, नेताजी गावतुरे, रजनीकांत मोटघरे, छगन शेडमाके, पार्शवनात आभारे, हरबाजी मोरे, नितेश राठोड, अनिल कोठारे, निकेश कामीडवार, रमेश कोडापे, भैयाजी मुद्दमवार, ढिवरू मेश्राम, सुरेश भांडेकर, प्रफुल बारसागडे, प्रकाश तुंबडे, रमेश कोडापे, गणेश कोवे, बाळू किणेकर, निकेश गद्देवार, दिगंबर धानोरकर, सुधीर शिवणकर, रोशन कोहळे, मुन्ना गोंगले सह हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.