Home महाराष्ट्र कोटरा येथे शिवसेनेची बैठक संपन्न

कोटरा येथे शिवसेनेची बैठक संपन्न

113

🔸कोटरा भागातील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

🔹कोरची तालुक्यात शिवसेना संघटन वाढवणार

✒️कोरची(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोरची(दि.3सप्टेंबर):-:-कोरची तालुक्यातील कोटरा येथे आज शिवसेनेची बैठक दिनांक ३/९/२०२३ पार पडली या बठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल होते या बैठकीत सर्वप्रथम शिवसेना. संघटन वाढविण्या विषयी चर्चा करण्यात या प्रसंगी कोटरा विभागाचे नवनियुक्त विभाग प्रमुख सदाशिव गाहाने यांनी या विभागातील प्रतेक गावा गावात शाखा वाढविण्या विषयी ग्वाही दिली या नंतर या भागातील उपस्थित नागरिकांनी शेतीकरिता विद्युत मीटर साठी ३/४ वर्षा पासून डिमांड भरूनही विद्युत पुरवठा मिळाला नाही वन हक्क पट्ट्या साठी पात्र असूनही पट्टे मिळाले नाही कोठरा गावात येणारी बस अनेक दिवसा पासून बंद आहे असे अनेक समस्या सांगितले.

या सर्व समस्या ऐकल्या नंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हटले कोरची तालुक्यात अनेक अनेक समस्या आहेत परंतु समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन फेल ठरले आहे विकासाच्या मोठ्या बाता करायच्या प्रतेक्षात कोरची भागात बघितले असता पाहिजे तसा विकास झालेला नाही जो विकास काँग्रेस च्या जमान्यात झाला तेवढाच विकास दिसत आहे महाराष्ट्रात केंद्रांत भाजप चे सरकार आहे हे सरकार विकासाच्या बाता करतात प्रतेक्षत विकासा काहीच करीत नाही हे फक्त बाता आणि थापा मारणारे आहे कोरची भागतील समस्या सोडविण्यासाठी शिवसेना आपल्या पाठीशी आहे कोरची तालुक्यातील विकास करण्या करिता शिवसेना वेळ प्रसंगी आंदोलन करेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल यांनी दिला आहे या वेळेस उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम यांनी म्हटले की जास्तीत जास्त लोकांनी शिवसेनेत सामील व्हा असे आव्हान केले.

माजी सभापती पुंडलिक देशमुख यानी म्हटले की गावाचा तालुक्याचा जिल्हयाचा विकास करायचा असेल तर शिवसेना शिवाय पर्याय नाही या बैठकीत शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र सिंह चंदेल उप जिल्हा प्रमुख अविनाश गेडाम माजी नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती पुंडलिक देशमुख वडसा तालुका उप प्रमुख संदीप म्याकलवार. कोरची तालुका प्रमुख डॉ नरेश देशमुख विभाग प्रमुख गाहने गजानन बोरकर बळीराम मडावी रुपचंद देशमुख राहुल मलगाम ब्रिजेश दखणे झाडुराम ऊईके भोजराज चौधरी चंदरसाय मलगाम भारत साहारे शाम साय ऊइके ओमप्रकाश सहारे उदाराम ताडामी उर्मिला बाई तिरपुडे व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here