Home महाराष्ट्र चंद्रपूर लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस लढण्याची शक्यता…?

चंद्रपूर लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस लढण्याची शक्यता…?

487

🔹Possibility of Devendra Fadnavis contesting for Chandrapur Loksabha…?

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-8605592830

चंद्रपूर(दि.2सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंञी करण्याची दाट शक्यता पूर्वीपासून व्यक्त करण्यात येत आहे. परंतू त्यांना राज्यसभेचे खासदार करावे की लोकसभेचे हाही प्रश्न चर्चेत आहे. मग देवेंद्र फडणवीस सध्या नागपूरचे रहिवाशी आहे. Devendra Fadnavis is currently a resident of Nagpur. परंतू नागपूरचे सध्या खासदार व क्रमांक १ चे मंञी नितीनजी गडकरी Nitin Gadkari तेथील खासदार आहे. त्यांना बाजूला करून देवेंद्र फडणवीस यांना तिकीट देणे भाजपाला धोक्याचे ठरू शकते.

देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी घ्यावी, अशी मागणी सुरू आहे.There is a demand that Devendra Fadnavis should seek Lok Sabha candidature from Pune constituency. परंतू देवेंद्र फडणवीस यांनी सदर मागणीला नकार दिला आहे. याचे कारण असे असू शकते की, त्यांचे कार्यक्षेञ विदर्भ आहे, मग ते पुण्याची तिकीट घेणे हे तेथील लोकांच्या नाराजींचे कारण होवू शकते.

काही राजकीय चर्चेच्या व अंदाज, आडाखे बांधणाऱ्या लोकांच्या चर्चेवरून असा अंदाज व्यक्त करण्यात येतो की, चंद्रपूर लोकसभा मतदार संघChandrapur Lok Sabha Constituency यापूर्वी भाजपाचा बालेकिल्ला होता.

परंतू मागील निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त चंद्रपूर लोकसभा ही काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी जिंकली होती. या जागेवर भाजपचे हंसराज अहीर Hansraj Ahir यांचा पराभव झाला होता. त्यांची कारकीर्द चांगली राहिलेली होती.

देवेंद्र फडणवीस हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील रहिवाशी आहे. त्यांचे वडील स्व.गंगाधरराव फडणवीस हे नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार होते. तर त्यांच्या काकू शोभाताई फडणवीस ह्या मूल मतदार संघाच्या आमदार होत्या, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा संबंध फार पूर्वीपासून चंद्रपूर जिल्ह्याशी राहिलेला आहे. या मतदार संघात सध्या मूलचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार MLA Sudhirbhau Mungantiwar आहेत परंतू त्यांचेही नाव चंद्रपूर लोकसभेसाठी सुरू आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले हंसराज अहीर यांचाही दावा असू शकतो. त्याप्रमाणेच देवराव भोंगळे अन्य उमेदवाराचा दावाही असू शकतो. सबळ उमेदवारी सुधीरभाऊ मुनगंटीवारांची असू शकते. परंतू भाजपामध्ये उघड गटबाजी नाही मात्र मतदारसंघात अंतर्गत गटबाजी नाही हे नाकारता येत नाही? देवेंद्र फडणवीस जर लोकसभेचे चंद्रपूर येथे उमेदवार असतील तर येथे भाजपचे सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करू शकतात.

तसेच त्यांच्या जमेची बाजू अशी की, चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewae यांचा महाराष्ट्र सरकारला पाठिंबा आहे. तसेच वणी जि. यवतमाळचे आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार हे आहेत व वणी विधानसभा मतदार संघ हा चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी हा मतदार संघही चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट आहे. येथेही भाजपची परिस्थिती मजबूत आहे. तसेच वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना या भागात भाजप पक्ष म्हणून तसेच हंसराज अहीर व सुधीर मुनगंटीवार यांनी निर्माण केलेल्या कार्यामुळे अनेक मतदार येथेही आहेत.

इथे फक्त प्रश्न एवढाच येतो की, चार वेळा निवडून आलेले व आमदार व मंञी असलेले सुधीर मुनगंटीवारांचे काय? पक्षश्रेष्ठींनी जर ठरवले तर देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकाणी उपमुख्यमंञी, मुख्यमंञी Deputy Chief Minister, Chief Minister या पदावर ते येवू शकतात. यामुळे कोणावर अन्याय होण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही. तसेच हंसराज अहीर यांनाही मंञीपदाचा दर्जा असणारे पदही देता येईल. याप्रकारे सर्वच ठिक होवू शकते. देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूर लोकसभेचे प्रभावी खासदार होवू शकतात एवढेच नव्हे तर त्यांना पुढे कॅबिनेट मंञी मिळू शकते व केंद्रात त्यांचे चांगले वजन असल्यामुळे विकासाची अनेक कामे ते चंद्रपूर-वणी-आर्णी व एकुण चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आणू शकतात. सध्या ते केंद्रातही पावरफुल आहेत. तसेच त्यांच्या ठिकाणी राज्यात सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंञी वा उपमुख्यमंञी वर्णी लागली तर चंद्रपूरचा विकास वेगाने होवू शकतो. नाराजीचे काहीच कारण नाही. हे योग्य समीकरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here