✒️मुंबई,विशेष प्रतिनिधी(श्याम ठाणेदार)मो:-9922546295
मुंबई(दि.2सप्टेंबर):- जोगेश्वरी पूर्व येथील सामजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांना नुकताच अखिल भारतीय मानव विकास परिषद, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र न्यूज १८ यांच्यावतीने “आदर्श भारतीय राजदूत २०२३” हा पुरस्कार सामाजिक विभाग या क्षेत्रातून जाहीर करण्यात आला आहे. विक्रोळी येथे दि.१० सप्टेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे नरेश म्हस्के मा. महापौर ठाणे मनपा, पवन अग्रवाल मॅनेजमेंट गुरू, बिगबोस फेम संतोष चौधरी उर्फ दादुस, सुवर्णाताई कारंजे मा. विधी समिती अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे आयोजक व महाराष्ट्र न्यूज १८ या वाहिनीचे मुख्य संपादक डॉ. संजय भोईर यांनी सांगितले.
समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या विभुतीना हा पुरस्कार देण्यात येणार असून हिरवे सर मागील अनेक वर्षापासून समाजातील वंचित, गोरगरीब, आदिवासी विद्यार्थीना मदत, तसेच अनेक नागरी कामे, अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात.अनेक सामाजिक संस्था, मंडळे यांच्याबरोबर त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध असून त्यांनी स्थापन केलेल्या जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या मार्फत देखील ते अनेक गरजूंना नेहमीच मदत करीत असतात. यापूर्वीही हिरवे सराना अनेक पुरस्कार मिळाले असून करोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय काम केलं होत.हा मनाचा पुरस्कार मिळाल्याने समाजातील अनेकांनी हिरवे यांचे अभिनंदन केले असून योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळणार असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.