Home खेलकुद  वेणूताई चव्हाण कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

वेणूताई चव्हाण कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

101

✒️कराड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कराड(दि.1सप्टेंबर):-स्व. दादासाहेब उंडाळकर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, उंडाळे आयोजित तालुकास्तरीय शालेय शासकीय कुस्ती क्रीडास्पर्धेचे आयोजन शिवाजी कुस्ती संकूल, कराड या ठिकाणी करण्यात आले होते.   या स्पर्धेत (17 वर्षे वयोगटात मुले) वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडचे खेळाडू श्री. प्रणव उद्धव पाटील (11 वी कला) याने 92 किलो वजनी गटात ग्रीको-रोमन क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला. व तो जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेसाठी पात्र ठरला. तसेच श्री. मोहम्मद हुजेका जब्बार पटेल (11 वी कला) याने 110 वजनी किलोगटात फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेचे  नियोजन शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. आझम इनामदर सर यांनी केले.
 

    महाविद्यालयातील या गुणवंत खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे श्री. शिवाजी शिक्षण संख्या, उच्च शिक्षण मंडळ, कराड़चे जनरल सेक्रेटरी मा. श्री. अल्ताफ हुसेन मुल्ला साहेब तसेस मा. श्री. अरुन (काका) पांडूरंग पाटील (सदस्य श्री. शिवाजी शिक्षण संस्था उच्चशिक्षण मंडळ, कराड,) महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

याचबरोबर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. आर. ए. कांबळे सर, क्रीडा विभागप्रमुख मा. एम. एम. कदम-पाटील सर, मा. श्री. व्ही. एस. ढाफळे सर, श्रीमती सुनिता जाधव तसेच पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी व विद्यार्थीनी  यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here