Home Breaking News श्री राजू पठाण यांना विशेष मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

श्री राजू पठाण यांना विशेष मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

124

 

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर राजापूर तालुका येवला विद्यालयातील मुख्याध्यापक श्री राजू पठाण यांना हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री विजय करंजकर यांच्यामार्फत दिला जाणारा विशेष उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून प्रदान करण्यात आला.
सदर कार्यक्रम रावसाहेब थोरात सभागृह नाशिक या ठिकाणी संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी श्री विजय आप्पा करंजकर,श्री बबनराव घोलप, आमदार किशोर भाऊ दराडे, श्री अद्वैय हिरे, श्री सुनील बागुल, माजी आमदार श्री सुधीर तांबे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस श्री नितीन जी ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला
श्री राजू पठाण यांना विशेष उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्यामुळे विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. सत्काराप्रसंगी स्थानिक संचालक श्री विजय नाना सानप, संचालक श्री तुळशीराम आप्पा विंचू, प्राध्यापक श्री बापू दराडे, प्राध्यापक श्री अनिल कोतकर, श्री थोरे सर,श्री कांगणे सर, श्रीमती भोगे मॅडम उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here