Home महाराष्ट्र माळी समाजाच्या वतीने रोशन चव्हाण यांचा शाल ग्रंथ पुष्पगुच्छ देऊन सत्कार !…

माळी समाजाच्या वतीने रोशन चव्हाण यांचा शाल ग्रंथ पुष्पगुच्छ देऊन सत्कार !…

117

🔸अभ्यासिकेतील मुलांनी असंच यश संपादन करावे – विठोबा माळी [ समाजाध्यक्ष ]

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगांव(दि.1सप्टेंबर):- शहरातील मोठा माळीवाडा येथील संत श्री सावता माळी समाज धरणगांव संचलित क्रांतिज्योति सावित्रीआई फूले अभ्यासिका तसेच तिरंगा अकॅडमी चा विद्यार्थी रोशन चव्हाण याची स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत ITBP मध्य निवड झाली. परिस्थितिशी झूंज देत त्यानें हे स्वप्न पूर्ण केले त्याचे कौतुक व सत्कार माळी समाज धरणगाव व अभ्यासिके तर्फॆ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी महाजन यांनी केले .

कार्यक्रम अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणुन उपाध्यक्ष निंबाजी महाजन, विश्वस्त विजय महाजन, राष्ट्रीय चर्मकार संघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, गटनेते कैलास माळी, आर.डी. महाजन, भैय्या महाजन उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात रोशन चव्हाण यांच्या हालाखीच्या परिस्थितीचे वर्णन करून त्याची जिद्द , चिकाटी, मेहनत यामुळे त्याला यश मिळाले असेच यश अभ्यासिकेतील मुलांनी प्राप्त करावे असे बोलून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित विचार मंचावरील मान्यवरांच्या शुभहस्ते रोशन चव्हाण याला शाल संत शिरोमणी सावता महाराज यांचा अनमोल ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आनंद व प्रवीण यांची सुरक्षा बल या ठिकाणी निवड झाली त्यांना देखील पुष्पगुच्छ देऊन समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डीगंबर महाजन, जयेश महाजन, किरण माळी, तिरंगा अकॅडमी मित्र परिवार परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार तिरंगा अकॅडमी चे ट्रेनर प्रशिक्षक निवृत्ती महाजन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here