🔸जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त सद्यशोधकांनी या अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे – पी.डी.पाटील [ जिल्हा समन्वयक सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य ]
✒️विशेष प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगांव(दि.1सप्टेंबर):- येत्या २४ सप्टेंबर २०२३ रविवार रोजी ला नाशिक येथे सत्यशोधक समाज संघाचे ऐतिहासिक राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार आहे. तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाला व विचारासं ज्या राजाने राजाश्रय दिला व त्या राजाच्या पाठबळामुळे नाशिक जिल्ह्यात सत्यशोधक चळवळ फोफावली व मराठा विद्या प्रसारक समाज ही संस्था उदयास आली तो महान राजा म्हणजेच सत्यशोधक राजर्षी शाहू महाराज.
याच छत्रपती राजर्षी शाहू महाराजाचें वंशज मा.युवराज संभाजीराजे ( कोल्हापूर ) हे सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षपुर्ती निमित्त नाशिक येथील ऐतिहासिक राजस्तरीय अधिवेशनाचे उदघाटन करणार आहेत. तरी महाराष्ट्रातील सर्व सत्यशोधकांनी या ऐतिहासिक अधिवेशनाचे साक्षीदार व्हावे असे आवाहन जळगाव जिल्हा समन्वयक पी.डी.पाटील यांनी केले आहे.