🔸माणुसकीची भिंत पुसद या सामाजिक संस्थेचा उपक्रम
✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.31ऑगस्ट):-माणुसकीची भिंत पुसद ही सामाजिक संस्था गोरगरीब व अनाथांना कपडे वाटप व मोफत अन्नदान करून मागील सात वर्षापासून निस्वार्थ सेवा करत आहे,अनाथ व निराधारां सोबत सण साजरे करीत असते. माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्यांनी वृद्धाश्रम व उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे गोरगरिबांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
रक्षाबंधनानिमित्त सकाळी बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम वाशिम रोड येथे,माणुसकीच्या भिंतीच्या महिला सदस्यांनी वृद्धाश्रमाची स्वच्छता करून रांगोळी काढून अंगण सजविले, पाटे मांडून त्या भोवती रांगोळी काढून वृद्धांना मोठ्या मायेने राखी बांधून महिलांनी त्यांना टावेल,टोपी,पेढा देऊन ओवाळले, अशा ज्येष्ठांबरोबर महिलांनी रक्षाबंधन साजरे करून त्यांना मायेची उब देण्याचा प्रयत्न केला,त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पुसद मधील बेघर गरजूसोबत माणुसकीच्या भिंतीच्या सर्व सदस्यांनी गोरगरीब निराधार महिलांकडून राखी बांधून घेतली व त्यांना ओवाळणी म्हणून साड्या व लुगडे भेट दिले.माणुसकीची भिंतीच्या महिला सदस्यांनी गोरगरीब निराधार पुरुषांना राखी बांधुन त्यांना टावेल,टोपी,पेढा देऊन सर्वांना पोळी, भात,भाजी,वरण व बुंदीच्या लाडूचे जेवण देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर पंडितराव देशमुख,उत्तम कांबळे,ऋषिकेश शिंदे,अविनाश राठोड,रत्नप्रभा शिंदे,अनिल शिंदे,प्रशांत शिंदे,एकनाथ पवार,मंगेश भगत,कदम,धनंजय कोठाळे, माणुसकीच्या भिंतीचे दत्तात्रय जाधव,गजानन जाधव,परसराम नरवाडे,सोहम नरवाडे,संतोष गावंडे,पंजाबराव ढेकळे,अनंताभाऊ चतुर,अरुण नागुलकर,धनंजय आघाम,आदित्य जाधव,दीपक सुरोशे व दीपक घाडगे महिला सदस्या मोनिका जाधव,रेखाताई आगलावे,प्रियंका बेले,अल्का आघाम,संध्या पतंगे,साधना ठाकरे,वर्षा जाधव,शिवनंदा शेलार,मेघा गावंडे,संध्या महल्ले,कामिनी चतुर,पूजा इंगोले,शीला वाकोडे,अर्चना गावंडे,रंजना किन्हेकर,अन्नपूर्णा ठाकरे,सुरेखा मोगरे,वंदना कदम,स्वातीताई भगत,सौ रत्नप्रभा शिंदे,अल्का शिंदे,कुमारी गौरी नागुलकर,वैष्णवी जाधव,गौरी जाधव,हरिभाऊ कांबळे,वसंता तारू,सुरेश कोकडकर,सटवाजी शेडूळे,जबार,कासाब,भुरे,गायकवाड,नगमाबाई व माणुसकीची भिंत हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.