Home अमरावती वसंतराव नाईक महाविद्यालयाचा विकास हेच माझे ध्येय – प्राचार्य डॉ.विजयकुमार गवई

वसंतराव नाईक महाविद्यालयाचा विकास हेच माझे ध्येय – प्राचार्य डॉ.विजयकुमार गवई

173

✒️अमरावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

अमरावती(दि.30ऑगस्ट):-“मी प्राचार्य झालो म्हणून समाज बांधव व समाज संघटना माझा सतत सत्कार करीत आहेत. माझ्या जागृत समाजाचे हे लक्षण आहे. सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार. संपूर्ण विद्यापीठात समाजाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला आज प्राप्त झालेली आहे.येथील आदिवासी विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष ठेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा तसेच एमपीएससी व यूपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करून घेतली जाणार आहे. थोर पुरुषांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून या महाविद्यालयाला अधिक उंचीवर पोहोचवून विकास करणे हेच माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.विजयकुमार गवई सत्काराला उत्तर देताना केले.

येथील कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे प्रा. डॉ. विजयकुमार गवई यांची वसंतराव नाईक महाविद्यालय, धारणी, जि.अमरावती येथे प्राचार्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी ते मनोगत व्यक्त करीत होते.

या सत्कार कार्यक्रमात कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे प्रा.डॉ.विजयकुमार गवई यांची प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल, सौ.स्नेहल राजू विरुळकर यांना शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल निलेश जामठे (अध्यक्ष,राष्ट्रीय चर्मकार महासंघ, जि. अमरावती) यांचा सामाजिक कार्याबद्दल आणि श्री राजूभाऊ विरुळकर यांचा सेवानिवृत्तीबद्दल शाल,पुष्पगुच्छ व प्रा. बुंदेले लिखित “अभंग तरंग ” हा काव्यसंग्रह भेट देऊन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बा.बुंदेले,कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकराव तायडे, प्रमुख अतिथी पुरुषोत्तम वनस्कर, डॉ.नंदकिशोर खंडारे,डॉ.गजानन चंदनकर, श्री सुखदेव नाठे,पांडुरंग धुमाळे, श्री अरुण शेगेकर,श्री सुनील शेगोकार, श्री ज्ञानेश्वर मालखेडे,श्री दिगंबर चोपडे यांनी नुकताच सत्कारमूर्तींच्या गृहालयी भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी,”सत्कार हे पुढील कार्य करण्याची प्रेरणा देतात.सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा देऊन सामाजिक बांधिलकी स्वीकारून जीवनात कार्य करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अशोक तायडे यांनी प्राचार्य डॉ. विजयकुमार गवई व सर्व सत्कारमूर्तींना शुभेच्छा देऊन प्रा.बुंदेले यांनी त्यांच्या आईच्या नावाने स्थापन केलेल्या प्रतिष्ठान द्वारे करीत असलेले कार्य हे स्तुत्य असून यापुढेही ते शैक्षणिक व सामाजिक कार्य प्रतिष्ठानद्वारे करत राहतील अशी आशा व्यक्त केली.प्रा अरुण बुंदेले यांनी ” आदर्श शिक्षक ” या स्वरचित अभंगाचे गायन केले.याप्रसंगी श्री पुरुषोत्तम वनस्कर, डॉ. नंदकिशोर खंडारे ,डॉ.गजानन चंदनकर, श्री सुखदेव नाठे,सौ.स्नेहल राजू विरुळकर, श्री निलेश जामठे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन श्री पांडुरंग धुमाळे तर आभार श्री अरुण शेगेकर यांनी मानले.कार्यक्रमाला अतुल गवई, सौरभ गवई, सौ.मंगला गवई, सात्विक चोपडे, दिगंबर चोपडे,कु.ज्ञानेश्वरी चोपडे, कु. रुतिका घोपे,सौ. किरण चोपडे व समाज बांधवांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here