✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधि)
पुसद(दि 30ऑगस्ट):- सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी नसणे,अशी सुलभ व्याख्या डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘ भ.बुद्ध आणि त्याचा धम्म ‘ या ग्रंथांत दिली असलीतरी, तिची व्याप्ती प्रचंड आहे ,आणि सम्यक दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी उपासकाला प्रचंड प्रयत्न करावे लागतात.मायावी जगाने मानव सुष्टीत अनेक भ्रम निर्माण केले आहेतआणि त्यामुळे लोक भ्रमीत झाले आहेत.या भ्रमाने मानवी जीवन दुःखमय झाले आहे.त्यातून मानवाची मुक्ती व्हावी म्हणून तथागतानी शिलासोबतच आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करण्याची शिकवण दिली आहे.अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी! माणसांने सम्यक दृष्टी धारण करणे अत्यंत आवश्यक आहे.सम्यक दृष्टीचा मार्ग चुकला की, सम्यक संकल्प या दुसऱ्या मार्गावर जाणे शक्य होत नाही,म्हणून सम्यक दृष्टीला निबाण मार्गात अन्यन्य महत्व आहे. उपासकांनी बुद्ध मार्गावर येण्यासाठी सम्यक दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘ असे आवाहन धम्मसंगितीने उपासकांना केले आहे.
श्रावण पौर्णिमा धम्मसंगितीचे आयोजन बुधवार दिनांक ३० आगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता चार्वाकवन ता.पुसद येथे करण्यात आले होते.संगितीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत जिल्हाधिकारी आयु.मनोहरराव भगत होते.वंदना झाल्यानंतर चार्वाकवन परिवाराचे सदस्य उपा.तातेराव मानकर यांचे दुःखद दि.१८ ला निधन झाले आहे.धम्मसंगितीत ,स्मृतीशेष तातेराव मानकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर धम्मसंगितीत प्रथमतःच सहभागी झालेले सर्व उपा.कमलेश पाटील, नारायणराव निवृत्ती जाधव, भोजराज कांबळे, दत्ता खंदारे,धारमोहा,बंडू विठ्ठलराव पारटकर यांचे धम्मसंगिती अध्यक्षांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
आयु.तुकाराम चौरे यांनी श्रावण पौर्णिमेचे बौद्धधम्मातील महत्त्व विशद केल्यानंतर धम्मसंगितीत ‘ सम्यक दृष्टी ‘ या विषयावर चर्चा झाली.मायावी जगाने मानव सृष्टीत अनेक भ्रम निर्माण करून मिथ्या दृष्टी विकसित केली आहे.मिथ्या दृष्टीचे उदाहरणे देऊन, चर्चेत भाग घेणाऱ्यांनी त्यांचा पर्दापाश केला आणि सम्यक दृष्टी म्हणजे काय? असे परोपरोनी समजावून सांगितले .चर्चेत सर्व आयु.नागोराव खंदारे, पी. बु. भगत, प्रकाश कांबळे, टी. बी. कानिंदे, यशवंतराव देशमुख ,दत्तानंद गोस्वामी, ल. पु. कांबळे आणि से.नि.प्राचार्य सुधाकरराव बनसोड यांनी भाग घेतला.
गायक, संगितकार कमलेश पाटील यांनी वामनदादा कर्डक यांचे धम्मगीत सादर केले आणि आयु.दत्तानंद गोस्वामी आणि ल.पु.कांबळे यांनी उस्थितांना अल्पोपहार दिला. उपासक संजय असोले यांनी आभार मानले.याशिवाय धम्मसंगितीत सर्व आयु.संगितीचे आयोजक अप्पाराव मैन्द,बंडू पारटकर,चंद्रकांत आठवले,रामदास आठवले, पी. एन. सूर्यवंशी, विश्वनाथ जोहरे, अनिल डोंगरे,यशकुमार भरणे, दयाराम जाधव ,वानोली,कृष्णा विठोबा मुनेश्वर,पोखरी,दीपक चंद्रकांत कांबळे,दत्ता नामदेव खंदारे, धारमोहा, साहेबराव गुजर, भीमराव भवरे, मोहदी, प्रल्हाद खडसे, दगडू कांबळे, सोपानराव वैराळे, भोजराज बळीराम कांबळे,दिपक सोनबाराव मोरे, सुधाकरराव चापके, कु.स्वेता गोस्वामी, प्रदीप तायडे, विश्वजित भगत हे उपस्थित होते.